शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
3
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
4
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
5
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
6
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
7
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
8
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
9
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
10
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
11
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
12
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
13
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
14
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
15
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
16
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
17
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
18
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
19
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
20
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू

गोंदिया ग्रंथोत्सवाला आजपासून प्रारंभ

By admin | Updated: March 23, 2015 01:35 IST

मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हा शासकीय ग्रंथालय ..

गोंदिया : मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हा शासकीय ग्रंथालय व श्री शारदा वाचनालय यांच्या संयुक्तवतीने २३ मार्चपासून येथील श्री शारदा वाचनालयातील बजाज सांस्कृतिक सभागृहात तीन दिवसीय गोंदिया ग्रंथोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रथम दिनी, २३ मार्च रोजी दुपारी १२ वाजता जेष्ठ झाडीबोली साहित्यीक डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात येईल. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, महिती व जनसंपर्क महासंचालनायाचे संचालक मोहन राठोड, कवयित्री अंजना खुणे, श्री शारदा वाचनालयाचे अध्यक्ष सतीशचंद्र बग्गा उपस्थित राहतील. दुपारी १.३० वाजता स्पर्धा परिक्षेच्या युगात ग्रंथालयांची भूमिका या विषयावर परिसंवाद, सायंकाळी ४.३० वाजता हे लिहायचे राहून गेले या विषयावर अनुभव-कथन, सायंकाळी ७ वाजता वैदर्भीय कवींच्या कवितांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. २४ मार्च रोजी दुपारी १२ वाजता २१ वे शतक आणि महिला सबलीकरण या विषयावर महाचर्चा तर सायंकाळी ६ वाजता रंग मराठी मातीचा लोककलाकृतीचा कार्यक्रम तसेच अंतिम दिनी २५ मार्च रोजी दुपारी १२ वाजता प्रमाण मराठी भाषा : नियम आणि लेखन या विषयावर कार्यशाळा, सांयकाळी ५ वाजता जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते यांच्या अध्यक्षतेत व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कृष्णा जनबंधू, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत काळे, जिल्हा अग्रणी प्रबंधक विवेक लखोटे, जिलहा कोषागार अधिकारी दिगंबर नेमाडे व राज्य परिवहन महामंडळाचे गोंदिया आगार व्यवस्थापक गौतम शेंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचा समारोप करण्यात येणार आहे. तर सायंकाळी ७ वाजता हास्यसम्राट डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांच्या मिर्झा एक्स्प्रेस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. (शहर प्रतिनिधी)