शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Gondia: गोंदिया शहरातील कचरा रस्त्यांच्या काठावर, कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न सुटेना

By कपिल केकत | Updated: August 18, 2022 17:54 IST

नगर परिषदेकडे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नसल्याने शहरातून संकलीत कचऱ्याच्या व्यवस्थापनाची समस्या पुन्हा एकदा डोकेवर काढत आहे. घराघरांतून संकलीत करण्यात आलेला कचरा सध्या रस्त्यांच्याकडेला तसेच मोकळ्या जागेत टाकला जात असल्याचे दिसत आहे.

- कपिल केकतगोंदिया : नगर परिषदेकडे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नसल्याने शहरातून संकलीत कचऱ्याच्या व्यवस्थापनाची समस्या पुन्हा एकदा डोकेवर काढत आहे. घराघरांतून संकलीत करण्यात आलेला कचरा सध्या रस्त्यांच्याकडेला तसेच मोकळ्या जागेत टाकला जात असल्याचे दिसत आहे. यावरून नगर परिषद स्वच्छतेच्या बाबतीत किती गंभीर आहे हे दिसून येते.

मोक्षधाम परिसरात टाकल्यानंतर कचरा जाळला जात असल्याने गणेशनगर व परिसरातील नागरिकांनी आंदोलनच छेडले होते. त्यानंतर प्रकल्पासाठी जागेचा शोध घेण्यात आला. मात्र जागा काही मिळाली नाही व तीच परिस्थिती निर्माण झाली. यावर नगर परिषदेने हिरडामाली येथील खासगी प्रकल्पात कचरा टाकण्याबाबत व्यवस्था केली आहे. मात्र तेथेही गावकऱ्यांनी मोर्चा काढल्यानंतर कचरा घेतला जात नव्हता. यावर घंटागाड्या घराघरांतून संकलीत करीत असलेला कचरा रस्त्याच्याकडेला टाकत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी रस्त्याच्याकडेला व मोकळ्या जागेत कचऱ्याचे ढिगार लागलेले दिसत आहे.

हा प्रकार सध्या शहरातील प्रत्येकच भागात सुरू असून कर वसुली केली जात असल्याने घरातून कचरा संकलीत करून तो इतरत्र टाकावा एवढेच कार्य स्वच्छता विभागाकडून केले जात असल्याचे दिसत आहे. परिणामी याच गलिच्छ वातावरणात शहरवासीयांना श्वास घ्यावा लागत आहे. स्वच्छतेच्या नावावर कोट्यवधी रूपयांची उधळन सुरू असतानाच समस्या स्थिती मात्र जशी होती तशीच आहे. कर विभाग घेते कचरा संकलन करनगर परिषदेने आता कचरा संकलनावर कर आकारले असून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. असे असतानाच कित्येक दिवस घंटागाड्या येत नसल्याने लोकांच्या घरात कचरा जमत असल्याच्या तक्रारी आहेत. यावर मात्र कर विभागाकडून कर घेतला जात असल्याचे स्वच्छता विभागातातील कर्मचाऱ्यांचे म्हणणे असून ते आपली जबाबदारी धुडकावून देताना दिसतात. कर्मचारीच असे बोलत असल्यास स्वच्छता विभाग फक्त स्वच्छता मोहिमेपुरतीच तत्परता दाखविते असे दिसून येते.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र