शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
3
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
4
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
5
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
6
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
7
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
8
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
9
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
10
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
11
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
12
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
13
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
14
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
15
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
16
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
17
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
18
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
19
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
20
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया आगाराला दरमहा ३० लाखांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 00:38 IST

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गोंदिया आगाराला रिक्त पदांच्या ग्रहणाने ग्रासले आहे. आगारात १८ चालक व ३० वाहकांची पदे रिक्त आहेत. परिणामी आगाराला दररोजच्या सुमारे १२-१३ फेऱ्या रद्द कराव्या लागत आहेत.

ठळक मुद्देलागले रिक्तपदांचे ग्रहण : चालक व वाहकांची कमतरता

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गोंदिया आगाराला रिक्त पदांच्या ग्रहणाने ग्रासले आहे. आगारात १८ चालक व ३० वाहकांची पदे रिक्त आहेत. परिणामी आगाराला दररोजच्या सुमारे १२-१३ फेऱ्या रद्द कराव्या लागत आहेत. परिणामी गोंदिया आगाराला दररोज सुमारे १ लाख रूपये म्हणजेच महिन्याकाठी ३० लाख रूपयांचा फटका सहन करावा लागत आहे.‘कशाला करता विषाची परीक्षा- एसटी बरी खाजगी पेक्षा’ ही म्हण एसटीच्या प्रवासाला घेऊन चांगलीच प्रचलीत आहे. या म्हणीनुसारच बहुतांश प्रवासी एसटीनेच प्रवास करण्यात प्राथमिकता देतात. यामुळेच दुर्गम अशा गावांतही परिवहन महामंडळाची ‘लालपरी’ मोठ्या दिखामात शिरून आपली सेवा देत आहे. एसटीच्या या सेवेला बघता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आर्थिक दृष्टया नफ्यात असणे अपेक्षीत आहे. मात्र दिवसेंदिवस वाढत चाललेली प्रवासी वाहने त्यातच परिवहन महमंडळातीलच काही उणीवा महामंडळाला तोट्यात टाकत आहे.यात गोंदिया आगाराची स्थिती बघता आगाराला रिक्त पदांचे ग्रहण लागल्याचे दिसत असून तेच आगाराच्या आर्थिक नुकसानीला जबाबदार ठरत आहे. त्याचे असे की, ‘लालपरी’ची सेवा देणाºया चालक व वाहकांचे पद गोंदिया आगारात रिक्त पडून आहे. परिणामी आगाराला दिवसा १२ ते १३ बस फेºया रद्द कराव्या लागत आहेत. यातून आगाराला दिवसा सुमारे १ लाख रूपयांचा म्हणजेच महिन्याकाठी ३० लाख रूपयांचा फटका सहन करावा लागत असल्याची माहिती आहे. चालक व वाहकांची कमी असल्याने आहे त्या चालक-वाहकांकडून ओव्हर टाईम करवून घ्यावे लागत आहे. मात्र तरिही बस फेºया रद्द कराव्या लागत असल्याने आगार आर्थिक नुकसानीत आहे.विशेष म्हणजे, चालक व वाहकांची रिक्त असलेली पदे भरण्यात यावी यासाठी आगार व्यवस्थापकांकडून प्रयत्न केले जातात. मात्र वरिष्ठ अधिकारी पद भरतीचे अधिकार आपल्याकडे नसल्याने सांगत हात मोकळे करीत असल्याचे प्रकारही घडत असल्याची माहिती आहे. मात्र याचा फटका आगार व महामंडळालाच बसत असल्याने रिक्त पदे भरल्यास गोंदिया आगाराच्या तिजोरीत नक्कीच भर पडणार आहे.१८ चालक तर ३० वाहकांची पदे रिक्तगोंदिया आगाराच्या आस्थापनेत १४४ चालक व तेवढीच वाहकांची पदे मंजूर आहेत. मात्र आजघडीला आगारात १२६ चालक व ११४ वाहक कार्यरत आहेत. म्हणजेच, चालकांची १८ पदे रिक्त असून वाहकांची ३० पदे रिक्त आहेत. याशिवाय मेक ॅनिकची ५३ पदे मंजूर असून सध्या ४३ मेकॅनिक कार्यरत आहेत.या शिवाय अन्य कर्मकारीही आहेत. आगारातून दिवसाला ४२२ फेºयांची ये-जा होते. मात्र चालक व वाहकांची कमी असल्याने दररोज १२ ते १३ फेºया रद्द कराव्या लागत आहेत.

टॅग्स :Bus Driverबसचालक