शहरं
Join us  
Trending Stories
1
Satara Crime: महिला डॉक्टरने थेट सातारच्या डीएसपींनाही फोन केलेला...; आतेभावाच्या आरोपाने खळबळ
2
हायब्रिड गाड्या जास्त प्रदूषण करतात...; उत्तर प्रदेश सरकारने सबसिडी रोखली
3
प्रामाणिक करदात्यांसोबत नम्रपणे वागा, बेईमानी करणाऱ्या.., पाहा अधिकाऱ्यांना काय म्हणाल्या निर्मला सीतारामन?
4
पीएसआय गोपाल बदने अद्यापही फरार, बनकर पहाटे सापडला; महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट
5
'साथिया'फेम अभिनेत्री संध्या मृदुलला मिळेना काम; म्हणाली, "भाई, हा काय नवीन सीन आहे..."
6
घरातून मांजरीची पिल्ले गायब झाली, संतापलेली पुतणी थेट पोलीस स्टेशनला पोहोचली; काका-काकूंवर दाखल केला FIR! 
7
Tarot Card: कामात गुंतवून घ्या, आठवडा आनंदात जाईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
8
IND vs AUS : गिलनं पुन्हा गमावला टॉस; युवा ऑलराउंडर दुखापतीमुळे OUT; कुलदीपसह प्रसिद्ध कृष्णाला संधी
9
टाटा मोटर्सचं नाव बदललं, आता 'या' नावाने शेअर बाजारात ओळखली जाणार कंपनी; डिमर्जरनंतर झाला मोठा बदल
10
सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या अणुशास्त्रज्ञाला वाचविले; सीआयएच्या माजी अधिकाऱ्याचे सनसनाटी गौप्यस्फोट 
11
SIP Investment: एका वर्षात एसआयपीनं भरला खिसा, मागील दिवाळीनंतर या ५ म्युच्युअल फंडांनी दिला २०% पेक्षा जास्त रिटर्न
12
"सलमान खानसोबत चित्रपट करणार नाही"; महेश मांजरेकरांचं मोठं विधान, म्हणाले- "मी त्याला शिवी..."
13
महागठबंधन नव्हे महालठबंधन, NDA मोडणार सर्व विक्रम; PM मोदींनी फुंकले प्रचाराचे रणशिंग
14
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, पतीने पत्नीला कुऱ्हाडीनं कापलं! नंतर पोलीस स्टेशनला जाऊन म्हणाला..
15
आजचे राशीभविष्य २५ ऑक्टोबर २०२५ : आठ राशींसाठी आजचा दिवस चांगला, इतर...
16
जान्हवी कपूर विवाहबंधनात अडकणार? अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल; लग्नाची तारीख सांगितल्याची चर्चा
17
५ दिवस पुन्हा अवकाळी; उत्तर विदर्भ वगळता राज्यभर बरसणार पावसाच्या सरी, ‘या’ ठिकाणी यलो अलर्ट
18
“...आता राज्यात ‘नैसर्गिक शेती मिशन’ राबविणार”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
देवाकडून मार्गदर्शन मागणे म्हणजे फसवणूक नाही; राम मंदिरचा निर्णय अवैध ठरवायची याचिका फेटाळली
20
भारत व्यापार करार दबावाखाली करत नाही; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी अमेरिकेला ठणकावले

Maharashtra Election 2019; गोंदिया जिल्ह्यात तरुण चेहऱ्याला संधी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 11:20 IST

राजकारणाच्या रणधुमाळीत तरुणांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची संधी देण्यासह त्यांचे नेतृत्व कौशल्यावर विश्वास टाकण्याचे धाडस कोणत्याही राजकीय पक्षाने दाखविले नाही. जिल्ह्यातील चारही मतदारसंघात तरुण चेहऱ्यांचा अभाव आहे.

ठळक मुद्दे केवळ प्रचारक म्हणूनच वापर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोणत्याही निवडणुकीत उमेदवाराचे भवितव्य निश्चित करण्यात तरुण मतदारांची महत्त्वाची भूमिका असते. आगामी विधानसभा निवडणुकीतही जिल्ह्यातील तरुण मतदारही येथील राजकारण्यांचे भवितव्य ठरवतील. त्यामुळे सर्वच मार्गाने तरुण मतदारांना आपआपल्या पक्षाकडे ओढण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करीत आहेत. मात्र या सगळ्या राजकारणाच्या रणधुमाळीत तरुणांना थेट राजकारणात संधी देण्याबाबत त्यांना थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची संधी देण्यासह त्यांचे नेतृत्व कौशल्यावर विश्वास टाकण्याचे धाडस कोणत्याही राजकीय पक्षाने दाखविले नाही. जिल्ह्यातील चारही मतदारसंघात तरुण चेहऱ्यांचा अभाव आहे.सर्वच राजकारण्यांना व राजकीय पक्षांना तरुणांची मते हवी आहेत. प्रचारासाठी तरुण कार्यकर्ते, तरुण पदाधिकारी हवे आहेत. मात्र थेट राजकारणामधील त्यांचा समावेश करण्यासाठी मात्र पक्ष उदासीन दिसून येत आहे. या विधानसभा निवडणुकीत अनेक तरुण उमेदवार इच्छुक असतांना या उमेदवारांना डावलण्यात आल्याचा आरोपही तरुणांकडून होत आहे. तरुणांचे शिक्षण, रोजगार आणि नोकरी या सर्व प्रश्नांना हत्यार करुन त्याबाबत कार्यक्रम घेवून राजकीय पक्ष पुढे येतात. तरुणांना रोजगाराचे आमिष दाखवून निवडणूक जिंकतात.मात्र पुढील पाच वर्ष त्याची अंमलबजावणी कितपत होते हा देखील संशोधनाचा विषय आहे. तरीही तरुणांना राजकारण आणि राजकारणाविषयी आकर्षण कमी झालेले दिसून येत आहे. रोजगार, नोकरी याबाबत नेहमीच राजकारणी, राज्यकर्ते, राजकीय पक्षांनी सोयीची भूमिका घेतल्याचे चित्र दिसून येते. राजकारणासारख्या क्षेत्रात तरुणांचे प्रश्न, त्यांच्या समस्यांबाबत मोठ्या प्रमाणात राजकारणांमध्ये उदासिनता आहे.निवडणुकीच्या तोंडावार तरुणांच्या बेरोजगारी, अशिक्षितपणा व गरीबीचा फायदा घेत निवडणुकीपुरता त्यांचा वापर करुन घेतला जातो. तरुणांचे ध्येय केवळ झेंडा हातात घेणारा, काहीसा उपद्रवीमूल्य असणारा आणि मौजमजा करण्यासाठी वेळ घालविणारा असे गृहीत धरुनच निवडणुकीसाठी तरुण वर्गाचा वापर केला जातो. राजकीय पोळ्या भाजण्यात मशगुल असणारे राजकीय पक्ष आणि राजकारणी हे तरुणांच्या प्रश्नांचे भांडवल करतात शिवाय तेही कमी पडले तर जात, धर्म व आरक्षण अशा भावनिक मुद्यांवर हात घालून तरुणांचे डोके भडकविण्याचे काम केले जाते. काही राजकारणी धर्मांध संघटनाचे नेते हे त्यासाठी काहीही करण्यास मागे पुढे पाहत नाही. ग्रामपंचायतीमध्ये एखादा सुशिक्षीत तरुणाने यायचे म्हटले की, राजकारण हे तुझे काम नाही, राजकारण करण्यापेक्षा आपले करिअर घडव असे फुकटचे सल्ले देऊन तरुणांना राजकारणापासून परावृत्त केले जाते. तरुणांनी राजकारणात येण्याची गरज आहे. तरुण राजकारणांमध्ये आल्यास व त्यांना योग्य पाठबळ मिळाल्यास किंवा सकारात्मक दिशा मिळाल्यास त्यांना एक उत्तम व्यासपीठ मिळू शकेल. आजची तरुण पिढी ही केवळ सोशल मीडीयावर प्रतिक्रिया देणारी नसून ती संघटीत होऊ शकते. त्यामुळे या तरुणपिढीकडे राजकीय व सामाजिक परिवर्तनाची ताकत आहे. ती नाकारता येणार नाही. आजची तरुण पिढी ही विज्ञान युगात वावरणारी असल्याने ती देशाच्या भवितव्याबाबत गंभीर राहून अनेक अभिनव उपक्रम व योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन राजकारण हे प्रगतीचे व्यासपीठ बनवू शकते.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019