शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 18:03 IST

Gondia News गोंदियात शनिवारी (दि.८) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली.

ठळक मुद्देसलग चौथ्या दिवशी पावसाची हजेरीरब्बी पिकांचे नुकसानशेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील चार दिवसांपासून अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने रब्बी हंगामातील धानपिके संकटात आली आहे. शनिवारी (दि.८) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली होती. जवळपास अर्धा तास झालेल्या अवकाळी पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पाणी साचले होते. तर पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. 

हवामान विभागाने जिल्ह्यात ११ मे पर्यंत अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा होण्याचा इशारा दिला आहे. तो अंदाज खरा ठरत आहे. मागील चार दिवसांपासून अवकाळी पाऊस सातत्याने हजेरी लावत आहे. शनिवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. जवळपास अर्धातास झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. तर या अवकाळी पावसाचा फटका रब्बी हंगामातील धानपिकाला आणि फळबागांना बसला आहे.

सध्या रब्बी हंगामातील धानाची कापणी आणि मळणी सुरु आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचे शेतातील धान कापणी करुन बांध्यामध्ये पडले आहे. या धानाला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. त्यामुळे शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला जाण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने सुध्दा अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला.

टॅग्स :Rainपाऊस