शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया जिल्ह्यात आणखी सात कोरोना बाधितांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 13:42 IST

गोंदिया जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. आज आणखी सात कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण वाढीचा वेग कायम आहे. विदेशातून येणाऱ्या नागरिकांमुळे जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. आज आणखी सात कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. यात गोंदिया कुंभारेनगर येथील एक आणि तिरोडा तालुक्यातील एक व गुजरात आणि विदेशातून परतलेल्या पाच जणांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्हावासीयांच्या चिंतेत भर पडली आहे. मात्र सात कोरोना बाधित आज कोरोनामुक्त झाल्याने जिल्हावासीयांना थोडा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात सध्या एकूण ५८ कोरोना अँक्टीव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण २०९ कोराना बाधितांची नोंद झाली आहे. तर १४९ कोरोना बाधित आतापर्यंत कोरोनामुक्त होवून आपल्या घरी परतले आहेत.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच तिरोडा तालुक्यातील एका कोरोना बाधिताचा आज सकाळी तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. या रुग्णाला शुक्रवारी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान उपचार सुरु असताना त्याचा आज सकाळी मृत्यू झाला. त्याच्या स्वँब नमुन्याचा अहवाल कोरोना पाझिटिव्ह आला आहे. याला रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. जिल्ह्यात यापूर्वी दोन जणांचा कोरोनाने मृत्यू झाला होता. गोंदिया आणि सडक अर्जुनी तालुक्यातील रुग्णाचा समावेश होता. तर आज तिरोडा तालुक्यातील एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाल्याने कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या आता तीनवर पोहचली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस