शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया जिल्ह्यात संतप्त पालकांनी ठोकले शाळेला कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 14:35 IST

सहा महिन्यांपासून शाळेला शिक्षक मिळत नसल्याच्या कारणाने मोहगाव तिल्ली येथील संतप्त गावकऱ्यांनी सोमवारी येथील जि.प. शाळेला कुलूप ठोकले. तर विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रवेशव्दारावर ठाण मांडून आपला निषेध नोंदवला.

ठळक मुद्देमोहगाव तिल्ली येथील शाळासहा महिन्यांपासून शिक्षकाचे पद रिक्त

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया: सहा महिन्यांपासून शाळेला शिक्षक मिळत नसल्याच्या कारणाने मोहगाव तिल्ली येथील संतप्त गावकऱ्यांनी सोमवारी येथील जि.प. शाळेला कुलूप ठोकले. तर विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रवेशव्दारावर ठाण मांडून आपला निषेध नोंदवला.मोहगाव-तिल्ली येथील जिल्हा परिषद केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळेत एक ते सातपर्यंत वर्ग आहेत. या शाळेत सध्या सहा शिक्षक कार्यरत आहेत. शाळेत पदवीधर व उच्चश्रेणी मुख्याध्यापकाचे पद रिक्त आहे. मागील सहा महिन्यांपासून पद रिक्त असताना प्रभारी मुख्याध्यापक एच.के.धपाडे यांची बदली करण्यात आली. प्रभारी मुख्याध्यापकाच्या बदली प्रकरणाने संतप्त झालेल्या गावकºयांनी शाळेच्या प्रवेशद्वारासमोर विद्याथ्यार्ना बसवून शाळा उघडू देणार असा पवित्रा घेतला. आधी रिक्त पदे भरा नंतरच शिक्षकांची बदली करा अशी मागणी लावून धरली. जोपर्यंत बदली आदेश रद्द होणार नाही व सहा महिन्यांपासून रिक्त असलेले शिक्षकांचे पद भरले जाणार नाही तोपर्यंत शाळेचे कुलूप उघडू देणार नाही, असा पवित्रा पालकांनी घेतला आहे. शिक्षण विभाग एकीकडे जिल्ह्यात शिक्षक अतिरिक्त असल्याचे सांगत आहे. तर दुसरीकडे अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे शिक्षण विभागाचा गलथान कारभार पुन्हा एकदा सामोर आला आहे. सरपंच अल्का पाथोडे, उपसरपंच दिगंबर कटरे, रेवालाल गौतम, सुकचारी रहांगडाले, लोकराम बोपचे, चुन्नीलाल गौतम, यादोराव बोपचे, विनोद पटले, खिलेश्वर बोपचे, ज्योती जगनित, मालीक गौतम, ब्रिजलाल पटले व गावकºयांनी शाळेच्या प्रवेशव्दारासमोरच ठाण मांडले आहे. शिक्षण विभाग यासंदर्भात काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

टॅग्स :Schoolशाळा