शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

गोंदिया जिल्ह्यात तंटामुक्तीचे हुंडाबंदीकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 10:38 IST

आॅनलाईन लोकमतगोंदिया : महात्मा गांधी तंटामुक्त मोहीम सुरू झाल्यापासून पहिल्या दोन वर्षात जिल्ह्यातील समित्यांनी उपवराला मुलीच्या मंडळीकडून हुंडा मागू देणार नाही, असा पवित्रा घेत दोन वर्ष काही समित्यांनी चांगले कार्य केले. लग्नात उपवर मागत असलेल्या हुंड्याकडेही तंटामुक्त समित्यांनी लक्ष दिले आहे. परंतु शासनानेच या तंटामुक्त गाव मोहीमेकडे दुर्लक्ष केल्यामुळे महात्मा ...

ठळक मुद्देवाढू लागली उदासिनताविधवा परित्यक्तांना आधार वाऱ्यावर

आॅनलाईन लोकमतगोंदिया : महात्मा गांधी तंटामुक्त मोहीम सुरू झाल्यापासून पहिल्या दोन वर्षात जिल्ह्यातील समित्यांनी उपवराला मुलीच्या मंडळीकडून हुंडा मागू देणार नाही, असा पवित्रा घेत दोन वर्ष काही समित्यांनी चांगले कार्य केले. लग्नात उपवर मागत असलेल्या हुंड्याकडेही तंटामुक्त समित्यांनी लक्ष दिले आहे. परंतु शासनानेच या तंटामुक्त गाव मोहीमेकडे दुर्लक्ष केल्यामुळे महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांचे  हुंडाबंदी मागणीकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे.महाराष्ट्र शासनाने न्यायालयाच्या डोक्यावरील कामाचा ताण व पोलिसांचा वाढता भार पाहून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम अंमलात आणली. या मोहीमेअंतर्गत गावातील तंटे गावातच सामोपचाराने सोडवून नविन तंटे उद्भवणार नाही. याशिवाय गावातील अनिष्ठ रूढी, रितीरिवाज व परंपरा यांचा नायनाट गाव गाड्यातून करावा अशी समज समित्यांना देण्यात आली होती. गावात असलेल्या विधवा, परित्यक्ता व दुर्बल महिलांचे संरक्षण व्हावे, त्याच्यावर अन्याय होऊ नये याची खबरदारी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांनी घ्यायला हवी, असे शासन निर्णयात नमूद केले. समाजात भ्रूणहत्येचे वाढलेले प्रमाण पाहून त्या प्रमाणावर आळा घालण्यासाठी व स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी मुलींना जन्म देणाऱ्या मातांचा सत्कार करण्याचा उपक्रम राबविला होता.तंटामुक्त समित्यांनी पुरस्कार रकमेतून ५०० रुपये प्रति महिलेला देऊन मुलींना जन्म देणाºया मातांना कन्यारत्न भेट तर नवविवाहिताना माहेर व सासरभेट देण्यात आली. परंतु गावातील परित्यक्ता व विधवा महिलांच्या उत्थानासाठी तंटामुक्त समित्यांनी वाखाणण्याजोगे कार्य केले होते. महिलांच्या सक्षमीकरणासाठी तंटामुक्तीने पाऊल उचलले होते. परंतु आता तंटामुक्त समित्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे समजते. शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्ष पदावर ३० टक्के महिला असाव्यात असेही सुचविले होते. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.पैसा, वेळ व त्रासाची बचततंटामुक्त मोहीमेमुळे गावातील तंटे गावातच सांमजस्याने सोडविले जात असल्याने वाद घालणाऱ्या दोन्ही पक्षाच्या लोकांच्या पैशाची बचत झाली. न्यायालयात चकरा मारण्यासाठी लागणाऱ्या वेळेची बचत झाली. आर्थिक त्रास व मानसिक त्रास याचीही नागरिकांची बचत झाली. सोबतच पोलीस यंत्रणेचा व न्यायालयाच्या डोक्यावरील कामाचा बोझा कमी झाला. वेळ, पैसा व त्रास वाचविण्यासाठी तंटामुक्त मोहीम रामबाण उपाय असल्याचे मत समिक्षकांनी शासनाला पाठविलेल्या अहवालात म्हटले आहे.विनीयोगाचे काय झाले?तंटामुक्त मोहिमेच्या पुरस्कार मिळालेल्या गावांनी पुरस्कार रकमेचा विनियोग कशाप्रकारे केला. त्याचे लेखापरिक्षण करून अहवाल शासनाला पाठविण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाला पाठविण्यात यावे, असे पत्र मुख्य कार्यपालन अधिकारी यांना निर्गमीत केले होते. खंडविकास अधिकाऱ्यांनी लेखा परीक्षण केल्यानंतरच अहवाल शासनाकडे सादर करावा, असे आवाहन केले होते परंतु त्याचे काय झाले कळलेच नाही.