शहरं
Join us  
Trending Stories
1
पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांकडून हत्येचा गंभीर आरोप, वरळी पोलीस ठाण्यात आक्रोश
2
युद्धाचा भडका उडणार, अमेरिका 'या' देशात सत्तांतर घडवण्याच्या तयारीत?; विमाने रद्द, युद्धनौका, लढाऊ विमाने तैनात
3
कर्मचारीहिताचा मोठा निर्णय! 'गिग वर्कर्स'नाही मिळणार PF-ग्रॅच्युइटी; नवीन लेबर कोडचे ३ महत्त्वाचे फायदे!
4
टॉर्चर अन् चॅटिंगने १० महिन्यातच संपवला संसार; पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीच्या मृत्यू प्रकरणात गूढ वाढले
5
काळाचा घाला! नैनीतालमध्ये भीषण अपघात, खोल दरीत पडली कार; तिघांचा मृत्यू, १ जखमी
6
"लढाई करून जिंकण्याचा दम नाही म्हणूनच..."; दिल्ली स्फोटावरून लष्करप्रमुख द्विवेदींनी पाकिस्तानचे काढले वाभाडे
7
टीम इंडियावर वनडेत नवा कर्णधार शोधण्याची वेळ! कोण घेणार शुभमन गिलची जागा?
8
जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांवर टांगती तलवार; सुप्रीम कोर्टात काय होईल? इच्छुकांची घालमेल
9
VIDEO: हरलेल्या संघाच्या कॅप्टनला विचारलं- "जिंकल्यावर कसं वाटतंय?"; चूक लक्षात येताच....
10
"तू आई-वडिलांना छोट्या गोष्टी..."; फिजिओथेरपिस्टचा होणाऱ्या नवऱ्याला मेसेज, का संपवलं आयुष्य?
11
५ डॉक्टरांनी २६ लाख जमवले; दिल्लीतील स्फोट फक्त ट्रेलर, अनेक शहरांत हल्ल्याची योजना, NIA चा खुलासा
12
आमदार आल्यानंतर उभे न राहिल्याने डॉक्टरवर कारवाई; हायकोर्टानं काढली सरकारची खरडपट्टी, म्हणाले...
13
VIDEO: तुझे लागे न नजरिया... श्रेयंका अन् जेमिमाचा 'टीम इंडिया'च्या पोरींसोबत भन्नाट डान्स
14
नाशिक: तस्कर टोळीतील एकाने वनपथकाच्या हाती दिल्या तुरी; बाऱ्हे वनविश्रामगृहातून ठोकली धूम
15
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
16
VIDEO: स्मृती मंधानाचा होणाऱ्या पतीसोबत अफलातून डान्स, लग्नाआधी 'संगीत'मध्ये तुफान धम्माल
17
मेहनती आहात, सातत्याने काम करता तरीही तुमचे करिअर 'स्लो' झालेय?; तुम्ही ५ 'ट्रॅप'मध्ये अडकलात
18
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
19
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
20
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus in Gondia; कोरोनाच्या लढ्यासाठी गोंदिया जिल्हा बँकेचा मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 20:39 IST

गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्व संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांनी सरकारला मदतीचा हात देत ८ लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देसंचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांचा सहभागआठ लाख रुपयांचा निधी देणार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनामुळे देशात मोठी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. देश आणि राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शासन आणि प्रशासन युध्द पातळीवर प्रयत्न करीत आहेत. हा लढा आणखी बळकट करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. देशाप्रती असलेली आपली सामाजिक बांधलकी जपत गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्व संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांनी सरकारला मदतीचा हात देत ८ लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाने सर्वसंमत्तीने देशात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत सरकारच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला. कोरोना विरुध्द लढा देण्यासाठी संचालक मंडळाने ५ लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधी जमा करण्यात येणार असल्याचे बँकेचे अध्यक्ष राजेंद्र जैन यांनी सांगितले. बँकेच्या संचालक मंडळापाठोपाठ बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आपले एक दिवसाचे वेतन कोरोना विरुध्दचा लढा अधिक सक्षम करण्यासाठी देण्याचा निर्णय कर्मचारी संघटेनेचे अध्यक्ष सुनील कन्नमवार व सचिव किशोर यांनी घेतला असल्याचे बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी सुरेश टेटे यांनी सांगितले. जिल्हा बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे एक दिवसाच्या वेतनाचा ३ लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केला जाणार आहे.गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांनी नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली असून संकटकालीन परिस्थिती नेहमी धावून जाण्याचा परिचय दिला आहे.विशेष काही दिवसांपूर्वीच संचालक मंडळाने कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांना पीक कजार्ची परतफेड करण्यास तीन महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. यामुळे जिल्ह्यातील ३६ हजारावर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांनी कोरोना विरुध्दच्या लढ्यासाठी दिलेल्या मदतीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.कोरोनामुळे देशात संकटकालीन परिस्थिती निर्माण झाली आहे.राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. शासन आणि प्रशासन याविरुध्द सक्षमपणे लढा देत आहे. हा लढा अधिक सक्षमपणे लढता यावा यासाठी बँकेच्या संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांनी एकूण ८ लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.- राजेंद्र जैन,अध्यक्ष गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस