शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
5
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
6
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
7
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
8
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
9
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
10
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
11
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
12
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
13
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
14
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
15
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
16
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
17
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
18
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
19
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
20
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

आंतरजातीय विवाह केल्याबद्दल दंड ठोठावणाऱ्यांविरुद्ध गोंदियात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 6:59 PM

गावातील लोकांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून हजारो रुपये वसूल करणाऱ्या किन्ही येथील मरार समाज समितीच्या चार पदाधिकाऱ्यांवर रावणवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  

ठळक मुद्देमरार समाजाच्या चौघांवर गुन्हासामाजिक बहिष्काराची दिली होती धमकी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गावातील लोकांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून हजारो रुपये वसूल करणाऱ्या किन्ही येथील मरार समाज समितीच्या चार पदाधिकाऱ्यांवर रावणवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  गोंदिया तालुक्याच्या किन्ही येथील दिगंबर मेतलाल खरे याने याने सन २०११ मध्ये वर्धा जिल्ह्यातील एका दलित समाजाच्या मुलीसोबत आंतरजातीय विवाह केला. तो मुंबईला शिक्षक म्हणून काम करताना मुंबई येथे एका तरूणीच्या संपर्कात आल्यामुळे त्याने आंतरजातीय विवाह केला. ती सुध्दा मुंबईला शिक्षक म्हणून कार्यरत आहे. या आंतरजातीय विवाहामुळे गावातील मरार समाज सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिगंबरच्या कुटुंबियांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याची धमकी दिली. मरार समाज समितीने ६ जून २०११ ला घेतलेल्या बैठकीत खरे कुटुंबियांकडून या आंतरजातीय विवाहाचे दंड म्हणून ६१ हजार रुपये घेण्यात आले. दंड दिल्यानंतर गावातील लोक त्यांच्यासोबत बोलचाल करून लागले. सन २०१७ मध्ये दिगंबरची आजी मरण पावली तिच्या मृत्यूची बातमी खरे कुटुंबियांनी इसुलाल कहनावत याला दिली नाही, म्हणून त्याच्याकडून ११०० रुपये पुन्हा दंड घेण्यात आला. या प्रकाराला कंटाळलेल्या दिगंबरचा भाऊ बुनेंद्रकुमार मेतलाल खरे (२७) याने या संदर्भात रावणवाडी पोलिसात तक्रार केली. खरे कुटुंबियांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याच्या नावावर त्यांच्याकडून ६२ हजार १०० रुपये दंड घेणाऱ्या चौघांवर रावणवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  सन २०११ मध्ये बुनेंद्रकुमार यांच्या भावाने आंतरजातीय विवाह केला. त्यामुळे त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकण्याची धमकी देत दंड म्हणून ६२ हजार १०० रुपए वसूल करणाऱ्या आरोपी फत्तेलाल कहनावत (५८), सुंदरलाल कहनावत (५५), इसूलाल कहनावत व हंसराज खरे सर्व रा. किन्ही यांच्यावर भादंविच्या कलम ३८४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस हवालदार दीपक पाटील करीत आहेत.  उत्पन्नावर ठरते दंडाची रक्कममरार समाज समितीने दंडाच्या नावावर गावातील लोकांकडून मोठ्या प्रमाणात वसूल केलेल्या रकमेचा हिशेबच नसल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे. किती लोकांकडून किती दंड वसूल केले याची माहिती देण्यास समिती नाकारत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. समाजाविरूध्द एखाद्याने कृत्य केले त्यावर दंड आकारला जातो. परंतु हा दंड सर्वांना समान न आकारता त्या व्यक्तीच्या आर्थिक उत्पन्नानुसार दंड आकारत असल्याची माहिती आहे. एका तरूणावर सामाजिक बहिष्कार किन्ही येथील एका मरार समाजाच्या तरूणाने पोवार समाजातील एका तरूणीशी प्रेमविवाह केला त्यामुळे त्या तरूणावरही ३१ हजार रुपए दंड करण्यात आला. परंतु त्या तरूणाची आर्थिक परिसथिती हलाकीची असल्यामुळे त्याच्यावर मागील सहा महिन्यापासून बहिष्कार टाकण्यात आल्याची माहिती आता  येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तंटामुक्त समिती गप्प का?महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती प्रेमविरांसाठी व आंतरजातीय विवाह करणाऱ्यांसाठी वरदान ठरली असल्याचे चित्र जिकडे-तिकडे उभे आहे. परंतु गोंदिया तालुक्याच्या किन्ही येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने या प्रेमवीरांना मदत का केली नाही यावर चर्चा सुरू आहे. गावात सामाजिक सलोखा राखण्याचे काम करणाऱ्या तंटामुक्त गाव समितीने किन्ही गावातील बिघडलेल्या सामाजिक स्वास्थाकडे दुर्लक्ष केले आहे. 

टॅग्स :marriageलग्न