शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
2
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
3
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी, हरयाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्रासह सहा अटकेत 
5
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
6
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
7
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
8
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
9
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
10
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
11
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
12
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
13
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
14
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
15
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
16
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
17
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
18
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
19
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक

गोंदिया आगाराला रिक्त पदांचे ग्रहण

By admin | Updated: July 7, 2016 02:00 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या गोंदिया आगारात कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत.

शेड्युल बदलले : मुख्य यांत्रिकाचे पदही भरले नाहीगोंदिया : राज्य परिवहन महामंडळाच्या गोंदिया आगारात कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे बसफेऱ्यांच्या शेड्युलमध्ये वारंवार बदल करावे लागत आहे. एसटी महामंडळाने तातडीने रिक्त पदांची पूर्तता केल्यास गोंदिया आगाराच्या उत्पन्नात वाढ होवू शकते. गोंदिया आगारात वाहकांची एकूण १७२ पदे मंजूर आहेत. मात्र सध्या आगारात १२७ वाहक असून तब्बल ४५ वाहकांची पदे रिक्त आहेत. तर चालकांचीसुद्धा १७२ पदे मंजूर आहेत. मात्र १४५ चालक कार्यरत असून २७ चालकांची पदे रिक्त आहेत. तसेच यांत्रिकांची ५७ पदे मंजूर असून केवळ ४० यांत्रिक कार्यरत असून १७ यांत्रिकांची पदे रिक्तच आहेत. वाहक, चालक व यांत्रिक मिळून तब्बल ८९ पदे गोंदिया आगारात रिक्त आहेत. विशेष म्हणजे मुख्य यांत्रिकाचे एक पद रिक्त आहे. मात्र इतर यांत्रिक कार्य सांभाळत असल्याने गोंदिया आगाराची बससेवा सुरू आहे. परंतु वाहकांची ४५ पदे व चालकांची २७ पदे रिक्त असल्याने चालक वाहकांच्या संख्येत मोठीच तफावत आहे. त्यामुळे वारंवार शेड्युलमध्ये बदल करावा लागतो. अशात वाहकाला दुसऱ्या शेड्युलमध्ये ओव्हरटाईम करावा लागतो. मात्र वाहकाने ओव्हरटाईमसाठी नकार दिला किंवा एखादा वाहक सुट्टीवर गेला तर तेवढ्या किलोमीटरचा प्रवास रद्द करावा लागतो. मानव विकास कार्यक्रमांतर्गत धावणाऱ्या बसेसचा शेड्युल फिक्स असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यात बदल होत नसून नियमित त्या बसेस धावतात. जवळपास सर्वच मार्गावर मानव विकासच्या बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. सध्या विद्यार्थिनींचे पासेस बनविण्याचे कार्य सुरू आहे. काही मार्गावर विद्यार्थिनींच्या पासेस बनविण्यात आल्या नसल्याने व त्या मार्गावर विद्यार्थी संख्या पासअभावी किंवा शाळा बरोबर सुरू झाल्या नसल्याचे फेऱ्या रद्द करण्याची पाळी येते. गोंदिया आगारात दोन दिवसांतून एकदा डिझेलचा टँकर येत असल्याने डिझेलची कमतरता भासत नाही. मात्र वाहक व चालक यांच्या पदसंख्येत संतुलन नसल्यामुळेच गोंदिया आगाराच्या बसफेऱ्या वारंवार रद्द करण्याची समस्या उद्भवते. (प्रतिनिधी)