शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
2
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
3
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
4
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
5
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
6
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
7
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
8
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
9
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
10
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
11
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
12
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
13
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
14
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
15
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
16
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
17
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
18
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
19
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
20
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?

यू-डायसमध्ये गोंदिया पुन्हा अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 13:21 IST

शाळांची माहिती यू-डायस प्लस फॉर्मद्वारे कमी कालावधीत संगणकीकृत करण्यात गोंदिया जिल्हा पुन्हा संपूर्ण राज्यात अव्वल ठरला आहे.

ठळक मुद्देवेळेच्या आत १०० टक्के काम संगणक प्रोग्रामरच्या कार्याला यशतंत्रस्नेही शिक्षकांची मदत

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील शाळांची माहिती यू-डायस प्लस फॉर्मद्वारे कमी कालावधीत संगणकीकृत करण्यात गोंदिया जिल्हा पुन्हा संपूर्ण राज्यात अव्वल ठरला आहे. राज्यात ऑनलाईन पद्धतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.याबाबत १०० टक्के काम पूर्ण झाले आहे. तसेच उस्मानाबाद जिल्हाही पहिला ठरला आहे. गोंदिया जिल्ह्याने १६६३ शाळांची संपूर्ण माहिती यशस्वीरित्या भरून सलग तिसऱ्यावर्षीही प्रथम येणाच्या मान पटकाविला आहे.संपूर्ण राज्यात संपूर्ण जिल्ह्यातील शाळांची माहिती ऑनलाईन पद्धतीने भारत यू-डायस प्लस या आॅनलाईन पद्धतीद्वारे भरण्यात येत आहे. यात गोंदिया जिल्हा दरवर्षी प्रमाणे यंदाही राज्यात अव्वल ठरला आहे. जिल्ह्यातील एकुण १ हजार ६६३ शाळांची माहिती यू-डायस प्रणालीद्वारे भरण्यात आलेली आहे. याचा तालुकानिहाय विचार केल्यास, आमगाव १५५ शाळा, अर्जुनी-मोरगाव २०८, देवरी २०७, गोंदिया ४१५, गोरेगाव १५८, सडक-अर्जुनी १६७, सालेकसा १५२, तिरोडा २०२ अश्या १६६३ शाळांची माहिती यू-डायस प्लस फॉर्मद्वारे भरण्यात आली आहे.

शंभर टक्के काम करणारा जिल्हाआदिवासी व नक्षलदृष्टया अतिसंवेदनशिल असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील शाळांची माहिती भरण्यात जिल्हा राज्यात दरवर्षी प्रमाणे यंदाही पहिल्याच क्रमांकावर राहीला. जिल्ह्याने शंभर टक्के काम पूर्ण केले आहे. यू-डायस प्लस फॉर्मद्वारे ३० डिसेंबर २०१९ ते २० फेब्रुवारी २०२० पर्यंत भरण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले होते. या कालावधीत गोंदिया जिल्ह्याने आपले काम पूर्ण केले आहे. या मुदतीपर्यंत अजूनही अनेक जिल्ह्यातील कामे पूर्ण झाली नाहीत.

विविध अभियानात अव्वल स्थान कायमगोंदिया जिल्हा आदिवासी व नक्षलदृष्टया अतिसंवेदनशिल असला तरी शिक्षणाच्या प्रगतील प्रगत महाराष्टÑ घडविण्यात गोंदिया जिल्हा कुठेही मागे नाही. ज्ञान रचनावाद असो, प्रगतशिल शाळा असो, असर सर्वेक्षण असो, वाचन कट्टा असो किंवा प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राच्या माध्यमातून राबविण्यात कोणतेही उपक्रम असोत हे राबविण्यात गोंदिया जिल्हा मागे राहात नाही. प्राथमिक शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे, संगणक प्रोग्रामर नितेश खंडेलवाल व तज्ज्ञ शिक्षकांच्या मेहनतीमुळे गोंदिया जिल्हा बहुतांश बाबींमध्ये राज्यात अव्वल स्थानावर आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र