शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया @ ५.२

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 22:34 IST

उत्तर भारतातून येणाऱ्या थंड हवेमुळे मागील तीन चार दिवसांपासून विदर्भात शीत लहर निर्माण झाली आहे. यामुळे तापमानात सातत्याने घट होत असून अनेक वर्षांचे रेकार्ड मोडले जात आहे. रविवारी (दि.३०) गोंदिया येथे मौसमातील सर्वात कमी ५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

ठळक मुद्देमौसमातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद : दैनदिन कामावर परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : उत्तर भारतातून येणाऱ्या थंड हवेमुळे मागील तीन चार दिवसांपासून विदर्भात शीत लहर निर्माण झाली आहे. यामुळे तापमानात सातत्याने घट होत असून अनेक वर्षांचे रेकार्ड मोडले जात आहे. रविवारी (दि.३०) गोंदिया येथे मौसमातील सर्वात कमी ५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. जिल्ह्यातील काही जाणकारांच्या मते मागील ३० ते ४० वर्षांतील हे सर्वात कमी तापमान असून आजपर्यंत ऐवढी थंडी कधी पाहिली नव्हती असे बोलले जात आहे. दरमान थंडीमुळे जिल्हाच गारठल्याचे चित्र असून सायंकाळी ६ वाजतानंतर रस्त्यांवर शुकशुकाट असल्याचे चित्र पाहयला मिळत आहे.मागील दोन दिवसांपासून पारा सरासरीच्या खाली घसरल्याने थंडीत कमालीची वाढ झाली आहे. दिवसभर वातावरणात गारवा राहत असल्याने हुडहुडी भरत आहे. रात्रीच्या वेळी तापमान प्रचंड घटत असल्याने कमालीची थंडी वाढली आहे. शनिवारी (दि.२९) गोंदिया येथे ६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यापाठोपाठ रविवारी ५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तापमानात सातत्याने घट होत असल्याचे चित्र आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार उत्तर भारतातून येणाऱ्या थंड हवेमुळे कडाक्याची थंडी पडली आहे. रविवारी सकाळपासून थंड वारा वाहत होता. त्यामुळे दिवसाचे तापमानही खाली आले होते. रविवारी दिवसभर कडक उन्ह असतानाही थंडी जाणवत होती. रात्रीच्या वेळी या थंडीत प्रचंड वाढ झाली. रविवारी गोंदिया येथे ५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.हे या मौसमातील सर्वात कमी तापमान असल्याने हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तर मागील वीस ते पंचविस वर्षाच्या तापमान पाहिले असता गोंदिया येथे प्रथमच ऐवढ्या कमी तापमानाची नोंद झालेली नाही. हुडहुडी भरणाऱ्या थंडीपासून बचाव करण्यासाठी प्रत्येकजण उबदार कपडे घालत आहे. शहरापासून ते ग्रामीण भागात ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचे दृष्य आहे.दिवसभर शेकोटीचा आधार घेत अनेक जण दिसत होते. सायंकाळी थंडीत वाढ झाल्याने रस्त्यावरही शुकशुकाट निर्माण झाला होता. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार ५ जानेवारीपर्यंत विदर्भात शीत लहर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखी काही दिवस हुडहुडी कायम राहणार आहे. या थंडीचा मनुष्यासोबतच प्राणीमात्रांवरही परिणाम होत आहे. अनेक पक्षी या थंडीमुळे मृत्यूमुखी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच उघड्यावर झोपणाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. उब मिळविण्यासाठी शेकट्यांचा आधार घेत आहे. ही थंडी आणखी काही दिवस राहणार असल्याने अनेकांनी याचा धसका घेतला आहे.सामाजिक संस्थाचा पुढाकारमागील तीन चार दिवसांपासून थंडीत प्रचंड वाढ झाल्याने उघड्यावर वास्तव्य करणाऱ्यांचे हाल झाले आहे. तर शहरातील काही सामाजिक संघटनानी उघड्यावर व रेल्वे स्थानकाबाहेर झोपणाऱ्या लोकांना ब्लॅकेंटचे वाटप करण्यास सुरुवात केली आहे.

टॅग्स :weatherहवामान