शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

गावाबाहेर जाताय... कुलूपबंद घर सांभाळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 05:00 IST

चोरी करणाऱ्या टोळीतील आरोपी हे दिवसाला शहरात किंवा गावात गल्लीतून वारंवार फेरफटका मारतात. दिवसा सकाळी बंद असलेल्या घराचे निरीक्षण ते वारंवार करतात. रस्त्याने जाताना ते त्या घरात जाण्याचा मार्ग,  त्या घरात प्रवेश कुठून करता येणार, चोरी केल्यावर कुणी आले तर आपल्या कुठून पळून जाता येईल, याचा अभ्यास चोरटे करतात. रात्री त्या घरात तीन-चार सदस्य जाऊन चोरी करतात. लाखोंचा ऐवज पळवून नेतात.

नरेश रहिलेलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  आपण कुटुंबासह बाहेरगावी जात असाल, तर सावध व्हा, आपल्या कुलूपबंद दारावर आपल्या कुणाची नजर नाही; परंतु रात्री घरफोडी करणाऱ्या चोरट्यांची नजर आहे. चोरटे त्या कुलूपबंद घरांचे दिवसभर निरीक्षण करून रात्रीच्या वेळी घरफोडी करतात. आपण कुटुंबासह बाहेरगावी जात असाल तर आपल्या घराची राखण करण्यासाठी एखादा नातेवाईक घरी ठेवावा तरच घर सोडावे, अन्यथा आपल्या घरातील पैसे, मौल्यवान दागिने चोरटे चोरून नेतील. चोरी करणाऱ्या टोळीतील आरोपी हे दिवसाला शहरात किंवा गावात गल्लीतून वारंवार फेरफटका मारतात. दिवसा सकाळी बंद असलेल्या घराचे निरीक्षण ते वारंवार करतात. रस्त्याने जाताना ते त्या घरात जाण्याचा मार्ग,  त्या घरात प्रवेश कुठून करता येणार, चोरी केल्यावर कुणी आले तर आपल्या कुठून पळून जाता येईल, याचा अभ्यास चोरटे करतात. रात्री त्या घरात तीन-चार सदस्य जाऊन चोरी करतात. लाखोंचा ऐवज पळवून नेतात. सध्या गोंदिया जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपासून दागिने स्वच्छ करणारी टोळी आली आहे. दागिने स्वच्छ करण्याच्या नावावर महिलांची नजर चुकवून दागिने पळवून नेत आहेत. दोन महिन्यांपासून ही टोळी गोंदिया जिल्ह्यात तिरोडा, गोरेगाव व गोंदिया या तीन तालुक्यांतच फिरत असून, पोलिसांनी या टोळीला अद्याप अटक केली नाही.

आठ महिन्यांत ४० घरफोड्या- गोंदिया जिल्ह्यात सन २०२१ मध्ये आठ महिन्यांत ४० घरफोड्या घडल्या आहेत. या ४० घरफोड्यांपैकी काही घरफोड्यांचे आरोपी पोलिसांनी पकडले, तर अनेक घरफोड्यांमधील आरोपी मोकाट आहेत. - स्थानिक गुन्हे शाखा व संबंधित पोलीस ठाणे उघडकीस न आलेल्या गुन्ह्यांना उघड करण्याचा प्रयत्न करीत असले तरी पोलिसांना चकमा देऊन चोरटे हात साफ करीत आहेत.- मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा घरफोड्यांचे प्रमाण कमी होते; परंतु आता दोन महिन्यांत मोठ्या प्रमाणात घरफोड्या वाढल्याने वर्षाच्या अखेरपर्यंत हा चोऱ्यांना आकडा फुगण्याची चिन्हे दिसत आहेत.

अनलॉकनंतर चोऱ्या वाढल्या- कोरोनामुळे बेरोजगारी वाढली, पैशाच्या हव्यासापायी तरुण मंडळी वाममार्गाला लागली आहे. चोऱ्या करून आपले शौक पूर्ण करण्याचे काम करतात.- कोरोनाच्या संकटामुळे आर्थिक चणचण निर्माण झाली, काम कुणी देईना मग पोटाची आग विझविण्यासाठी अनेकांनी चोरी, लुटमारी या कामाला सुरुवात केली आहे.

१८१ घरफोड्यांचा तपास सुरूच- सन २०१९ मध्ये झालेल्या १६० पैकी फक्त ३० घरफोड्या उघडकीस आल्या आहेत, तर १३० घरफोड्या उघडकीस आल्या नाहीत. - सन २०२० मध्ये ८० घरफोड्या झाल्या असून, २९ घरफोड्या उघडकीस आल्या आहेत. ५१ घरफोड्या उघडकीस आल्या नाहीत. जुन्या १८१ घरफोड्यांचा तपास सुरूच आहे.

 

टॅग्स :Thiefचोर