शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

बोहल्यावर चढण्यापूर्वीच उपवराला अत्याचार प्रकरणात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 21:16 IST

गावातील तरूणीला (१९) लग्नाचे आमिष देत तिचे वर्षभरापासून लैंगिक शोषण केले. त्यानंतर दुसऱ्याच मुलीशी विवाह ठरला. परंतु त्या उपवराने लग्नाच्या दोन दिवसांपूर्वी त्या मुलीवर बळजबरीने अत्याचार केला. इतकेच नव्हे तर तिला बेदम मारहाणही केली.

ठळक मुद्देकिकरीपार येथील घटना: गुन्हा दाखल होऊ नये म्हणून दबाव टाकण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गावातील तरूणीला (१९) लग्नाचे आमिष देत तिचे वर्षभरापासून लैंगिक शोषण केले. त्यानंतर दुसऱ्याच मुलीशी विवाह ठरला. परंतु त्या उपवराने लग्नाच्या दोन दिवसांपूर्वी त्या मुलीवर बळजबरीने अत्याचार केला. इतकेच नव्हे तर तिला बेदम मारहाणही केली. यासंदर्भात त्या उपवरावर आमगाव पोलिसांत तक्रार करण्यात आली. परिणामी बोहल्यावर चढण्यापूर्वीच त्या उपवराला अत्याचाराच्या प्रकरणात अटक करण्यात आली.सविस्तर असे की, आमगाव तालुक्यातील ग्राम किकरीपार येथील नीलेश पुनाराम मोटघरे (२५) असे अत्याचारी उपवराचे नाव आहे. निलेश गावातीलच एका अल्पवयीन मुलीला मागील तीन वर्षापासून त्रास देत होता. त्यातच तिच्याशी जवळीक साधून लग्नाचे आमिष देत तिचे लैंगिक शोषण केले. लग्नाचे आमिष देत तिच्यावर लैंगीक अत्याचार करण्याचा प्रकार सुरूच होता. यातच घरच्यांनी त्याचे लग्न गोंदिया तालुक्यातील ग्राम नवरगावकला येथील मुलीशी ठरविले. रितीरिवाजाप्रमाणे त्यांचा साखरपुडा झाला.तसेच ४ मे रोजी मंडपपूजन व ५ मे रोजी लग्न ठरले. परंतु निलेशने लग्नाच्या दोन दिवसांपूर्वी म्हणजेच ३ मे रोजी सायंकाळी ४ वाजता त्या मुलीवर बळजबरी केली. तू मला भेटली नाही तर तुला ठार करीन अशी धमकी देत तिला मारहाणही करीत होता. ३ एप्रिल रोजीही त्याने तिच्याशी अश्लील चाळे केले. तसेच पिडीत तरूणी घराच्या मागील भागात शौचासाठी गेली असताना निलेशने तिथे जाऊन त्याने तिच्यावर बळजबरी केली. यावेळी तिने आरडाओरड केली असता निलेशने तिला मारहाण केली. तिची हाक ऐकून नातेवाईक आले असता तो पळून गेला.निलेशचे रविवारी (दि.५) लग्न असताना बोहल्यावर चढण्यापूर्वीच त्याला आमगाव पोलिसांनी अत्याचार प्रकरणात अटक केली. विशेष म्हणजे, हे प्रकरण दडपण्यासाठी काही लोकप्रतिनिधींनी पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला असल्याचेही बोलले जात आहे. परंतु पिडीतेला न्याय देण्यासाठी आमगाव पोलिसांनी आपल्या कर्तव्यदक्षतेचा परिचय दिला. आरोपी विरूद्ध भादंविच्या कलम ३७६, ३५४, ३५४ ड, २९४, ३२३, ५०६ (२) सहकलम ४, ८ बाल लैंगिक अत्याचार अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे.एक वर्षापासून लैंगिक शोषणनीलेशने त्या तरूणीला आपल्या जाळ््यात घेतले व लग्नाचे आमिष तसेच धमकी देत तिच्यावर मागील एक वर्षापासून तो बळजबरी करीत होता. गावातील शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार करीत होता. ही बाब डॉक्टरांच्या वैद्यकीय अहवालातूनही स्पष्ट झाली आहे.

टॅग्स :Policeपोलिस