शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

आदिवासींना विकासाच्या मार्गावर चालविणे हेच ध्येय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 21:29 IST

गोंदिया जिल्हा नक्षलवाद्यांचे रेस्ट झोन नसून गडचिरोली सारखाच संवेदनशिल जिल्हा आहे. गडचिरोलीत भूसुरूंगस्फोट घडवून पोलिसांचे वाहन उडविण्यात आले. असाच भूसुरूंगस्फोट गोंदियातही घडविण्याचे मनसुबे नक्षल्यांचे होते.परंतु ऐनवेळी पोलिसांच्या सर्तकेने गोंदियातील नक्षलवाद्यांचा कुटील डाव फसला आणि ती स्फोटके जप्त केलीत.

ठळक मुद्देशासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणार

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया जिल्हा नक्षलवाद्यांचे रेस्ट झोन नसून गडचिरोली सारखाच संवेदनशिल जिल्हा आहे. गडचिरोलीत भूसुरूंगस्फोट घडवून पोलिसांचे वाहन उडविण्यात आले. असाच भूसुरूंगस्फोट गोंदियातही घडविण्याचे मनसुबे नक्षल्यांचे होते.परंतु ऐनवेळी पोलिसांच्या सर्तकेने गोंदियातील नक्षलवाद्यांचा कुटील डाव फसला आणि ती स्फोटके जप्त केलीत.गोंदिया जिल्ह्याच्या आमगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून अडीच महिन्यापूर्वी रूजू झालेले जालींदर नालकूल यांनी गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात राहणाऱ्या आदिवासी जनता व पोलीस यांच्यात समन्वय साधण्यासाठी आदिवासींना विकासाच्या मार्गावर नेणाºया विकास योजनांचा लाभ मिळवून देण्याचा चंग बांधला. लोकमतने घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी दिलखुलास चर्चा केली.२०१४ ला पोलीस दलात रूजू झालेले जालींदर नालकूल यांची नाशिक येथे ट्रेनिंग झाली. पहिली पोस्टींग नागपूर ग्रामीण येथे परिवेक्षाधिन अधिकारी म्हणून एक वर्ष, त्यानंतर रायगड व आता आमगाव उपविभागाचे ते उपविभागीय पोलीस अधिकारी आहेत. १५ मार्च २०१९ ला रूजू झालेले नालकूल यांनी नक्षलवाद्यांची मुसके आवळण्यासाठी त्यांना जेवण देणाºया आदिवासी जनतेला विश्वासात घेण्याचे काम सुरू केले.गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी जनता आधी पोलीसांना माहिती देत नव्हती. पोलीस गावात आले की लोक दार बंद करून घरात राहायचे. परंतु महाराष्टÑ शासनाने आणलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त मोहीमेमुळे आदिवासी जनता व पोलीस विभाग यांच्यात समन्वय साधला गेला. तंटामुक्त मोहीम ही पोलीस व नक्षलग्रस्त भागातील जनता यांच्या समन्वय साधणारा दुवा झाली. नालकूल म्हणाले विकासापासून जनता दूर असली की त्यांना विविध आमिष देऊन नक्षलवादी आपल्या चळवळीकडे वळवितात. त्यामुळे नक्षलवाद्यांना कुणीही सहकार्य करू नये यासाठी त्या जनतेला विकासाच्या समृध्द मार्गावर चालण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा थेट फायदा करून देण्यासाठी पोलीस विभाग तत्पर असल्याचे म्हणाले. निराधार, वृध्दांना, शेतकऱ्यांना व बेरोजगारांना विविध योजनांचा लाभ देऊन त्यांचा विकास करण्यासाठी पोलीस अधिकारी, कर्मचारी काम करणार आहेत. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या विविध योजनांना पोहचवून त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न करण्याचा माणस बांधला आहे. नक्षलवाद्यांचा खडतर मार्ग जीवन उध्वस्त करणारा आहे.सद्यास्थितीत सगळे लोक प्रगतीच्या मार्गावर चालण्यासाठी नक्षल चळवळीत असणारे लोकही चळवळ सोेडून आत्मसमर्पण योजनेचा लाभ घेत आहेत. लोकशाहीच्या मुख्यप्रवाहात येणाºयासाठी शासनाने नक्षल आत्मसमर्पण योजना अमंलात आणली. हिंसा करून काहीच साध्य होत नाही. आदिवासी जनतेने आपल्या समस्या, अडचणी यावर पोलिसांसमोर खुला संवाद करणेगरजेचे असल्याचे नालकूल म्हणाले. ‘झुंज करूणी का शिणता, रक्त पिपासू का बनता, असा आर्त सवाल करीत शांततेच्या आणि प्रगतीच्या मार्गावर चालण्यासाठी नक्षलवाद्यांनीही मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहनही त्यांनी मुलाखतीतून केले आहे.

टॅग्स :Policeपोलिस