शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्यसेवा आपल्या दारी पोहचविण्याचे लक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 00:10 IST

आरोग्य सेवा आपल्या दारी पोहचविण्याचे आमचे लक्ष्य असून ते आता सार्थकी लागणार असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.

ठळक मुद्देगोपाल अग्रवाल : रावणवाडी येथील आरोग्य शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आरोग्य सेवा आपल्या दारी पोहचविण्याचे आमचे लक्ष्य असून ते आता सार्थकी लागणार असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.लवकरच पाच कोटी रुपयांच्या निधीतून रावणवाडी रूग्णालयाची इमारत तयार होणार असून हेल्थ वेलनेस स्कीमच्या माध्यमातून केवळ गोंदिया तालुक्यातील सर्व ५६ आरोग्य उपकेद्रांमध्ये आयुर्वेदिक चिकित्सकांची नियुक्ती होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.जवळील ग्राम रावणवाडी येथे आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात ते बोलत होते. आमदार अग्रवाल म्हणाले, गोंदिया तालुका आरोग्य क्षेत्रात मागासलेला होता. मात्र आम्ही रजेगाव व खमारीसह नऊ नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांची सुरूवात केली. तर रजेगाव ग्रामीण रूग्णालयासाठी शासनाकडून अतिरिक्त १०८ रूग्णवाहिका सेवेला मंजुरी मिळविली आहे. हेल्थ वेलनेस योजने अंतर्गत चिकीत्सकांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांना कार्यक्षेत्रातील किमान २० नागरिकांच्या घरी जाऊन तपासणी करावी लागणार आहे. अशात आरोग्य सेवा खरोखरच आपल्या दारी येणार असल्याचे सांगीतले.याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी यांनी, क्षेत्रातील पुलांची उंची वाढविणे, मंदिर, रस्ते, कॉलेज, आरोग्य केंद्र आदि विविध कामे आमदार अग्रवाल यांच्या कार्याची ग्वाही देत असल्याचे मत व्यक्त केले.याप्रसंगी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रूखमोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. निमगडे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. खंडाते, जिल्हा परिषद सभापती रमेश अंबुले, सभापती लता दोनोडे, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, विजय लोणारे, ओमप्रकाश भक्तवर्ती, मनिष मेश्राम, गेंदलाल शरणागत, अंकेश हरिणखेडे, राजेंद्र कटरे, सूर्यप्रकाश भगत, जे.सी.तुरकर, बकाराम रहांगडाले, लक्ष्मण तावाडे, केशव तावाडे, सुरज खोटेले, संतोष घरसेले, चिंतामन चौधरी, सावलराम महारवाडे, हुक ुमचंद नागपुरे, रमन लिल्हारे, गिरधारी बघेले यांच्यासह मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते.५०० हून अधिक रूग्णांची आरोग्य तपासणीया आरोग्य शिबिरात रावणवाडीसह परिसरातील ५०० हून अधिक रूग्णांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून ईसीजी, ब्लडप्रेशर, शुगर, नेत्ररोग, दंतरोग, चर्मरोग, गरोदर माता, कुपोषीत बाळांची तपासणी करण्यात आली. तसेच त्यांना आवश्यक औषधांचे वितरणही शिबिरात करण्यात आले.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवालHealthआरोग्य