शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
2
"भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
3
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
4
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
5
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
6
Nexon EV Review: टाटाच्या नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
7
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
8
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
9
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
10
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
11
"मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...", 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट
12
दोन कोटींच्या चंदन चाेरीतील मुख्य आरोपी शरद पवार गटाचा नगरसेवक
13
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
14
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
15
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
16
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
17
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
18
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
19
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
20
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?

विश्वस्तरीय आरोग्य सेवा मिळावी हेच लक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 1:28 AM

गोंदियात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना करण्यामागे आमचे दोन उद्देश होते. एकतर तर येथील तरूणांना कमीतकमी खर्चात डॉक्टर बनण्याची संधी मिळावी. तसेच वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत पूर्ण झाल्यावर जिल्ह्यातील रूग्णांना उपचार उपलब्ध व्हावे.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : ग्राम रावणवाडी येथील आरोग्य शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदियात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना करण्यामागे आमचे दोन उद्देश होते. एकतर तर येथील तरूणांना कमीतकमी खर्चात डॉक्टर बनण्याची संधी मिळावी. तसेच वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत पूर्ण झाल्यावर जिल्ह्यातील रूग्णांना उपचार उपलब्ध व्हावे. जिल्ह्यातील एकाही रूग्णाला उपचारासाठी नागपूर किंवा मुंबईला जावे लागू नये व त्यांना येथेच विश्वस्तरीय आरोग्य सेवा मिळावी हेच आमचे लक्ष्य असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.तालुक्यातील ग्राम रावणवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजत आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना आमदार अग्रवाल यांनी, यावर्षी तालुक्यातील ग्राम सिवनी, लोहारा, तुमखेडा खुर्द, फुलचूरपेठ, बाजारटोला, पिंडकेपार, घिवारी, चांदनीटोला, खळबंदा, मोगर्रा येथे नवीन आरोग्य उपकेंद्रांची स्थापना केली जात आहे. तालुक्यातील ग्राम भागात संभव ती आरोग्य सेवा पोहचविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ नागरिकांना मिळावा यासाठी सदैव तत्पर असल्याचे मत व्यक्त केले.याप्रसंगी जिल्हा परिषद सभापती रमेश अंबुले यांनी, रावणाडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीसाठी आमदार अग्रवाल यांच्या प्रयत्नांनी ५ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. लवकरच इमारतीचे काम सुरू होणार आहे. आमदार अग्रवाल यांच्या नेतृत्वात जेवढी विकासकामे गोंदिया विधानसभा क्षेत्रात होत आहेत अन्य कोणत्याच क्षेत्रात होत नसल्याचे सांगीतले.कार्यक्रमाला जिल परिषद सभापती लता दोनोडे, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, प्रकाश रहमतकर, गेंदलाल शरणागत, योगराज उपराडे, अनिल मते, विनिता टेंभरे, निता पटले, प्रमिला करचाल, प्रकाश डहाट, जयप्रकाश बिसेन, सारंग भेलावे, इंद्रानी धावडे, देवेंद्र मानकर, गिरधारी पटले, रवि गजभिये, अंकेश हरिणखेडे, गमचंद तुरकर, मनोज बोरकर, राजु गौतम, टेकचंद सिहारे, सुर्यप्रकाश भगत, जे.सी.तुरकर, सुरेश उपवंशी यांच्यासह मोठ्या संख्येत गावकरी उपस्थित होते.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल