शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा क्षेत्राचा विकास हेच ध्येय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 22:25 IST

आमगाव-देवरी-सालेकसा या तिन्ही तालुक्यातील जनतेने आपल्या मतातून मला आमदार बनण्याचे सौभाग्य प्राप्त करुन दिले. त्यामुळे मी या जनतेला कसा विसरु शकतो. मागील चार वर्षात आपल्या विधानसभा क्षेत्रात शासनाच्या अनेक योजना लागू करण्यासाठी प्रयत्न केले.

ठळक मुद्देसंजय पुराम : साखरीपाट बाबा महोत्सवाचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कसाखरीटोला : आमगाव-देवरी-सालेकसा या तिन्ही तालुक्यातील जनतेने आपल्या मतातून मला आमदार बनण्याचे सौभाग्य प्राप्त करुन दिले. त्यामुळे मी या जनतेला कसा विसरु शकतो. मागील चार वर्षात आपल्या विधानसभा क्षेत्रात शासनाच्या अनेक योजना लागू करण्यासाठी प्रयत्न केले. अनेक विकासाची कामे केली, पुढेही करण्यात येतील जनतेला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत केली आहे. जनतेची सेवा हे मी माझे कर्तव्य समजतो. लोकांच्या मूलभूत सुविधांवर विशेष भर देऊन आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचा विकास करणे हेच माझे ध्येय आहे असे प्रतिपादन आमदार संजय पुराम यांनी केले.येथील साखरीपाट सामाजिक सेवा संस्थेच्यावतीने आयोजीत साखरीपाट बाबा महोत्सवाच्या समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रमात मंगळवारी (दि.१५) ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष उषा मेंढे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद बाल व महिला कल्याण सभापती लता दोनोडे, सुनील अग्रवाल, डॉ. संजय देशमुख, रमेश चुटे, डॉ. अजय उमाटे, समितीचे अध्यक्ष संतोष अग्रवाल, समितीचे सचिव संतोष बोहरे, डॉ. विजय वानखेडे, ज्योती वानखेडे, प्रदीप अग्रवाल, संदीप अग्रवाल, प्रदीप चुटे उपस्थित होते.पुढे बोलताना आमदार पुराम यांनी, धर्म आणि राजकारण यांचा संबंध असून प्रत्येक धर्माच्या लोकांनी आपल्या धर्मानुसार वागावे. प्रत्येक धार्मीयांसोबत सहिष्णूतेचे वातावरण निर्माण होईल याची काळजी घ्यावी असे मत व्यक्त करीत साकरीपाट बाबा मंदिराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करुन देऊन तिर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त होईल यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.सर्वप्रथम मंदिरातील देवी-देवताची पूजा-पाठ करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणाऱ्या शाळा व विद्यार्थ्यांना तसेच पतंग स्पर्धेतील उत्कृष्ट स्पर्धकांना आमदार पुराम यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. याप्रसंगी मेंढे व दोनोडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात डॉ. वानखेडे दाम्पत्यांचा मंदिराच्यावतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. संचालन प्रा. सागर काटेखाये यांनी केले. आभार संतोष बोहरे यांनी मानले. 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभा