शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या विकासाचे ध्येय पडले मागे

By admin | Updated: August 27, 2014 23:40 IST

शासनाने कृषी धोरणाअंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या वाढीव निधीअंतर्गत विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. परंतु योजना हाती असूनसुद्धा या योजनांची अंमलबजावणी होत नसल्याने

संशोधन नाहीच : शासनाचा निधीही झाला बंदयशवंत मानकर - आमगावशासनाने कृषी धोरणाअंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या वाढीव निधीअंतर्गत विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. परंतु योजना हाती असूनसुद्धा या योजनांची अंमलबजावणी होत नसल्याने शेती विकासाचे ध्येय मागे पडत आहे.आमगाव तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये शेती विकास योजनांच्या माध्यमातून आर्थिक संपन्नता आणावी यासाठी संशोधनाची सोय शासनाने उपलब्ध करून दिली. यासाठी शासनाने निधी कमी पडू दिला नाही. प्रारंभी कृषी विभागाने अनेक योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना संशोधनाच्या माध्यमाने उत्पन्नात वाढ करण्यास मदत मिळाली. वाढत्या उत्पन्नाने शेतकऱ्यांनी विविध पीकांची लागवड केली. परंतु कालांतराने आर्थिक तरतुदीमध्ये शासनाची मदत अपुरी पडली. त्यामुळे संशोधनाच्या कामाचा पार बोजवारा वाजला आहे.आमगाव येथील कृषी विभागाला दिलेल्या १८ हेक्टर कृषी जमिनीपैकी ४ हेक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ संशोधन विभागाला कृषी संशोधनासाठी उपलब्ध करून देण्यात आली. कृषी संशोधन नाला पुरक अशा नदी नाल्यांची सिंचन सुविधा या विभागाला याच कृषी जमिनीच्या ४.१० हेक्टर जागेवर उपलब्ध आहे. १० हेक्टर ओलीताखाली कृषी भूमी आहे. परंतु सोयीसुविधा उपलब्ध असून निधी व कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या व्यवस्थापनामुळे विभाग संशोधन कार्यात पुढेच जाऊ शकला नाही. विभागाला शासनाने योजनांच्या पूर्ततेसाठी सुविधा दिली, मात्र प्रत्यक्षात या विभागात व्यवस्थापनाच्या दिरंगाईने सर्वत्र सावळागोंधळ सुरू आहे.आर्थिक अडचणीमुळे विभागातील दैनंदिन काम आटोपण्यासाठी कंत्राट पद्धतीने मजुरांना कामे मिळत आहे. परंतु या कंत्राट पद्धतीतील मजुरांनाही मजुरीअभावी आर्थिक अडचणींना समोर जावे लागत आहे. सलग वर्षभरात मोजकी मजुरी देऊन मजुरांच्या तोंडाला पाने पुसण्यात येत आहे. परंतु विभागाला मिळणारा निधी कुठे मुरतो हा संशोधनाचा विषय आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून संशोधनात्मक माहिती मिळावी यासाठी प्रशिक्षण कार्यासाठी विभागाला निधी नाही. त्यामुळे संशोधन तरी काय होते? असा प्रश्नही पुढे येत आहे.आमगाव येथे माल्ही या गावात कृषी संशोधनासाठी जमीन उपलब्ध आहे. परंतु या संशोधनावर कार्य करणारा विभाग येथून बेपत्ता आहे. या विभागाचे कार्यालय सलग तीन किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे संशोधनाचे कार्य कार्यालयात, की शेत शिवारात असा संभ्रम निर्माण होतो.