शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
3
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
4
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
5
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
6
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
7
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
8
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
9
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
10
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
11
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
12
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
13
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
14
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
15
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
18
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
19
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
20
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार

उच्च ध्येयातून यशाचे शिखर गाठावे

By admin | Updated: December 22, 2016 01:14 IST

शालेय जिवनाच्या वातावरणात रममान होताना विद्यार्थ्यांनी एक महत्वाकांक्षी धोरण उराशी बाळगावे.

अहिल्या खोब्रागडे : विविध कार्यक्रमाने स्नेहसंमेलनाची सांगता बोंडगावदेवी : शालेय जिवनाच्या वातावरणात रममान होताना विद्यार्थ्यांनी एक महत्वाकांक्षी धोरण उराशी बाळगावे. आजचा विद्यार्थी हा उद्याचा भाग्यविधाता आहे. स्पर्धेच्या युगामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे पडू नये म्हणून शिक्षकांनी सामान्य ज्ञान द्यावे. गावातील विद्यार्थ्यांनी विज्ञानाच्या कसोटीवर उतरुन ध्येय, जिद्द, चिकाटी यांची खुणगाठ विद्यार्थ्यांनी मनात पक्की बांधली तर प्रगतीचे शिखर गाठणे सहज शक्य होईल, असे प्रतिपादन पंचायत समितीचे वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी अहिल्या खोब्रागडे यांनी केले. पिंपळगाव (खांबी) येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाच्या रजत महोत्सवानिमित्त आयोजित स्नेहसंमेलनाच्या समारोपाप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जि.प. सदस्या कमल पाऊलझगडे होत्या. अतिथी म्हणून राज्य शिक्षक संघाचे विभागीय अध्यक्ष खेमराज कोंड, पं.स. उपसभापती आशा झिलपे, माजी सभापती तानेश ताराम, वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी अहिल्या खोब्रागडे, इंद्रदास झिलपे, संस्था सचिव तथा मुख्याध्यापक डब्ल्यू.के.मेश्राम, संस्थापक अध्यक्ष यशवंत मेश्राम, राजू मेश्राम, खुशाल ब्राम्हणकर, लक्ष्मण ब्राम्हणकर, सुनील मेश्राम, प्रतिभा मेश्राम, पुष्पा राऊत उपस्थित होते. तीन दिवसीय स्नेहसंमेलनाचे उद्घाटन मिलींद विद्यालयाचे माजी प्राचार्य मधू रामटेके यांच्या अध्यक्षतेखाली जि.प. सदस्य किशोर तरोणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी पं.स.सभापती अरविंद शिवणकर, प्राचार्य यशवंत परशुरामकर, मानवता कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य नानेश्वर डोंगरवार, सरपंच प्रज्ञा डोंगरे, राकेश शेंडे, यशवंत मेश्राम, मुख्या.डब्ल्यू.के. मेश्राम उपस्थित होते. स्नेहसंमेलनात भावगीत, वादविवाद, रांगोळी, अंताक्षरी, चमचा गोळी, बचाव, प्रश्न मंजूषा, सुई-दोरा स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना चालना देण्यात आली. सांस्कृतीक कार्यक्रमांतून कलागुणांना वाव देण्यात आला. यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. संचालन एच.डी. लंजे, प्रास्ताविक माणिक खोब्रागडे तर आभार पी.टी. मस्के यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रतिभा धाकले, जितेंद्र डेकाटे, राहूल सोलंकी, अशोक हुमणे, प्रमोद मस्के, राजेश व्यवहारे, राजू मेश्राम, राजेश वलथरे, आकाश नैताम, प्रज्वला बेलखोडे यांनी सहकार्य केले.(वार्ताहर)