शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

अतिरिक्त घरभाडे भत्त्यासाठी प्राथमिक शिक्षक समिती न्यायालयात जाणार

By admin | Updated: July 21, 2014 00:16 IST

जिल्हा परिषद गोंदिया येथे जि.प.अंतर्गत शिक्षकांच्या समस्या निराकरणासाठी तक्रार निवारण सभेचे आयोजन रविवारला (दि.२०) करण्यात आले होते. सभेत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक

गोंदिया : जिल्हा परिषद गोंदिया येथे जि.प.अंतर्गत शिक्षकांच्या समस्या निराकरणासाठी तक्रार निवारण सभेचे आयोजन रविवारला (दि.२०) करण्यात आले होते. सभेत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने शिक्षकांच्या अनेक समस्या मांडल्या. परंतु मुख्य कार्यपालन अधिकारी गोंदिया यांनी शिक्षकांच्या समस्यांवर तोडगा काढण्याऐवजी ज्या तुमच्या समस्या आहे ते तुम्ही आयुक्त किंवा न्यायालयात जाऊन समस्या सोडवा असे म्हणाले. त्यामुळे शिक्षक समिती न्यायालयात जाणार आहे.शिक्षकांना अतिरिक्त घरभाडे देणे, एक स्तर पदोन्नतीनुसार पदविधर शिक्षकांना आगावू वेतनवाढ लागू करणे, उच्च शिक्षणाची परवानगी त्वरित देण्यात यावे, उच्च परीक्षेला बसण्याची परवानगी देणे, जिल्हा परिषद शिक्षण विभागावर संघटनेच्या प्रतिनिधी घेण्यात यावे, शालार्थ प्रणालीद्वारे सर्व शिक्षकांना १ तारखेला करावे, सर्व शाळा संगणकीकृत होत नाही तोपर्यंत सर्व शिक्षकांना वेतन पंचायत समिती स्तरावरून आॅनलाईन करावे, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करताना पती-पत्नी एकत्रीकरण व त्यांच्या समस्या जाणून समायोजन करणे, चटोपाध्याय वेतनश्रेणी वाढवणे, आरटीई नुसार चौथी तेथे पाचवी व सातवी तेथे आठवी उघडलेल्या शाळेत त्वरित शिक्षक देणे, आंतरजिल्हा बदली शिक्षकांचे सहाव्या वेतन आयोगाची नोंद करणे, सहाव्या वेतन आयोगाच्या पाचही टप्याची रक्कम जी.पी.एफमध्ये जमा करणे आदी समस्यांवर चर्चा करण्यात आली. सभेत शिक्षकांचे अतिरिक्त घरभाडे भत्ता लागू करणे आणि पदोन्नतीनुसार पदविधर शिक्षकांना आगावू वेतनवाढ लागू करण्यास स्पष्ट नकार देण्यात आला. याकरिता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा गोंदिया उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. सभेत शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष मनोज दीक्षित, महासचिव एल.यू. खोब्रागडे, शेषराव येडेकर, सुरेश रहांगडाले, किशोर डोंगरवार, व्ही.जी. राठोड, डी.एल. गुप्ता, आर.एस. बसोने, संदीप तिडके, एस.सी. पारधी, एन.बी. बिसेन, जी.सी. बघेले, ओमप्रकाश वासनिक, राजेंद्र बोपचे, नरेश बडवाईक, टी.आर. लिल्हारे, के.पी. रहमतकर, चौधरी, आर.वाय. मस्करे, पी.आर. टेंभरे, एस.एम. येडे, बी.आर. दीप उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)