आमगाव : या संकट काळात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ‘सेवा ही संघटन’ अंतर्गत केलेल्या कामाची जनतेने चांगली दखल घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या ७ वर्षांत केलेल्या विविध विकासकामे, धडाकेबाज निर्णयांचा सकारात्मक विचार ठेवून जनतेच्या सेवेत राहा, असे प्रतिपादन खा. सुनील मेंढे यांनी केले.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने येथील लक्ष्मणराव मानकर फार्मसी कॉलेजमध्ये रविवारी (दि. ४) आयोजित जिल्हा कार्यकारिणीतील प्रमुख पदाधिकारी, तालुका प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. कोविड काळात केंद्रातील मोदी सरकारने केलेल्या विविध कामांची व निर्णयांची माहिती यावेळी खासदार मेंढे यांनी सर्वांना दिली. बैठकीला जिल्हाध्यक्ष केशव मानकर, माजी मंत्री राजकुमार बडोले, प्रदेश सचिव संजय पुराम, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नेतराम कटरे, माजी आमदार रमेश कुथे, माजी आमदार भेरसिंग नागपुरे, संपर्क प्रमुख बाळा अंजनकर, जिल्हा महामंत्री संजय कुलकर्णी, प्रदेश कार्यकारी सदस्य रचना गहाने, सीता रहांगडाले, तिरोडा नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, चामेश्वर गहाणे, किसान आघाडी अध्यक्ष संजय टेंभरे, भाजयुमो अध्यक्ष ओम कटरे, अनु. मोर्चा अध्यक्ष जे.डी. जगणित, दिनेश दादरीवाल, मदन पटले, झामसिंग येरणे, बंटी पंचबुद्धे तसेच मंडळ अध्यक्ष, महामंत्री, सर्व पदाधिकारी उपस्थित होते.