शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

धानपिकाला द्या प्रोत्साहन अनुदान

By admin | Updated: December 6, 2014 22:51 IST

धान पिकाला उत्पादन खर्चावर आधारित किमान २ हजार रुपये प्रतीक्विंटल हमीभाव किंवा एकरी ३ हजार रुपये प्रोत्साहन अनुदान द्यावे या प्रमुख मागण्यांसह धान उत्पादन शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे

गोंदिया : धान पिकाला उत्पादन खर्चावर आधारित किमान २ हजार रुपये प्रतीक्विंटल हमीभाव किंवा एकरी ३ हजार रुपये प्रोत्साहन अनुदान द्यावे या प्रमुख मागण्यांसह धान उत्पादन शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना जिल्हा भाजपाकडून देण्यात आले. या निवेदनाची प्रत केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनाही पाठविण्यात आली.निवेदनात केलेल्या मागणीनुसार गेल्या काही वर्षापासून जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना अवर्षणाचा सामना करावा लागत आहे. त्यातच धान पिकाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नसल्याने कर्जाच्या जाचापोटी त्यांना आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागत आहे. त्यामुळे धानपिकाला २ हजार रुपयेप्रती क्विंटल हमीभाव किंवा शेतकऱ्यांला वर्तमान शासन निर्धारीत भाव कमी असल्याने होणाऱ्या नुकसानीच्या मोबदल्यात यावर्षी एकरी ३ हजार रुपये उत्पादन प्रोत्साहन अनुदान देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. तसेच शेतातच सिंचनाची व्यवस्था, १०० टक्के अनुदानावर ट्युबवेल देण्यात यावे, कृषी पंपासाठी वेगळा वीजपुरवठा देवून भारनियमन बंद करण्यात यावे, शेतीसाठी ७४ टक्के अनुदानावर सोलर पंप देण्यात यावे, ठिंबक व तुषार जल सिंचन योजना ७५ टक्के अनुदानावर देण्यात यावे, बागायती शेतीसाठी शेडनेट व इतर साधन समग्री ७५ टक्के अनुदानावर देवून त्याचा विमा काढण्यात यावा, शेतीपुरक व्यवसायासाठी ५० टक्केदान देण्यात यावे, ट्रॅक्टर, थ्रेसर, हार्वेस्टर, ७५ टक्के अनुदानावर देण्यात यावे. गोदामाकरीता ५० टक्के अनुदान देण्यात यावे, कृषी प्रक्रिया उद्योगाला ५० टक्के अनुदान देण्यात यावे, या मागण्यांचा समावेश निवेदनात आहे. निवेदन देताना भाजप जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, आ.राजकुमार बडोले, आ.विजय रहांगडाले, आ.भेरसिंग नागपुरे, दयाराम कापगते, हेमंत पटले, भाऊराव उके, जयंत शुक्ला, दिलीप चौधरी, झामसिंग येरणे, लक्ष्मण भगत उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)