शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगा नदी काठावरील गावांना प्रकल्पाचे पाणी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 21:45 IST

यावर्षी जिल्ह्यात कमी प्रमाणात पाऊस झाल्याने सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आहे. पावसाचा अभाव आणि कीडरोगांमुळे शेतकऱ्यांना हाती आलेले पिके गमवावी लागली. त्यामुळे रब्बी हंगामातून खरीपातील नुकसान भरपाई भरुन काढू, असा मानस शेतकऱ्यांचा आहे.

ठळक मुद्देशेतकºयांसमोर संकट : प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कपरसवाडा : यावर्षी जिल्ह्यात कमी प्रमाणात पाऊस झाल्याने सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आहे. पावसाचा अभाव आणि कीडरोगांमुळे शेतकऱ्यांना हाती आलेले पिके गमवावी लागली. त्यामुळे रब्बी हंगामातून खरीपातील नुकसान भरपाई भरुन काढू, असा मानस शेतकऱ्यांचा आहे. त्यासाठी वैनगंगा काठावरील गावांना रब्बी हंगामासाठी पाणी देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पामध्ये मोजकाच पाणी साठा आहे. त्यामुळे प्रशासनातर्फे शेतकºयांना रब्बी हंगामात धानाची लागवड न करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. हा नियम केवळ गोंदिया जिल्ह्यातच लागू करण्यात आल्याचे बोलल्या जाते. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती लक्षात घेता रब्बी हंगाम व उन्हाळी पिकांसाठी धापेवाडा प्रकल्पाचे पाणी वैनगंगा नदी काठावरील गावांना देण्यात यावे. अशी मागणी चांदोरी खुर्द, सावरा, पिपरिया, अर्जुनी, बिहिरीया, इंदोरा बु. करटी खुर्द, पुजारीटोला, महालगाव, मुरदाडा, बोंडरानी, सालेटोला, कवलेवाडा येथील शेतकऱ्यांनी केली आहे. खरीपातील पिकांचे पाऊस आणि कीडरोगांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी व शेतमजुरांच्या हाताला काम नाही. हाती आलेले पीक पावसाअभावी गमवावे लागल्याने शेतकºयावर आर्थिक संकट ओढावले आहे. या तालुक्यातील शेतकऱ्यांची स्थिती लक्षात घेता सिंचन प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवून उर्वरित पाणी रब्बी आणि उन्हाळी धान पिकांसाठी देण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे. धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत कवलेवाडा, धादरी, बेलाटी, मुंडीपार, चिरेखनी, बेलाटी या गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पात सद्यस्थितीत ३६ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. ७ मीटर पाणी बाहेर वाहत आहे. महिनाभरात वाहून जाणारे १ लाख १० हजार घन मिटर पाणी अडविणे शक्य आहे. त्यासाठी आतापासून पाणी साठवून ठेवल्यास पाणी टंचाईच्या समस्येवर व शेतकºयांच्या पाणी समस्यावर मात करणे शक्य आहे. शेतकºयांना पाणी दिल्यास शेतकऱ्यांना उत्पन्न घेण्यास मदत होईल.टप्पा-२ द्वारे सर्व तळ्यात पाणीधापेवाडा उपसा सिंचन प्रकल्प टप्पा-२ ची निर्मिती करण्यात आली आहे. यातून खळंबदा जलाशयात व परिसरातील पाणी देणे शक्य आहे. मात्र कुठल्याही तलावात पाणी सोडले जात नाही. खैरबंदा जलाशयात फक्त पावसाळ्यात आठ दहा दिवस अल्प प्रमाणात पाणी सोडण्यात आले व बंद करण्यात आले. तलाव कोरडे पडले आहेत. ज्या उद्देशाने निर्मिती करण्यात आली तो उद्देश देखील साध्य होत नसल्याचे चित्र आहे.पाणीटंचाईवर मात शक्यरब्बी व उन्हाळी धान पिकासंबंधित धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत येणाऱ्या गावांना व नदी काठावरील गावांना पाणी दिल्यास विहिरी, बोअरवेल, तळ्याच्या पाणी साठ्यात वाढ होईल. यामुळे पाणी टंचाईवर मात करणे शक्य होईल. पावसाळ्यात ३० मि.मी. व उन्हाळ्यात ३५ दलघमी पाणी लागते. त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन केल्यासपाणीटंचाईच्या समस्येवर मात करुन उन्हाळी पिकांना पाणी देणे उपसा करणे शक्य होईल.