लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : गोरेगाव शहरात विविध विकास कामे करण्यासाठी विशेष पॅकेज देण्यात यावे, अशी मागणी नगराध्यक्ष आशिष बारेवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच मुंबई येथे भेट घेऊन केली.या वेळी राज्यमंत्री डॉ.परिणय फुके, आमदार विजय रंहांगडाले, आमदार संजय पुराम,लक्ष्मीकांत बारेवार, नितिन बारेवार उपस्थित होते.याप्रसंगी आशिष बारेवार यांनी शहरातील विविध विकासांची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली. तसेच शहराच्या विकास कामांसाठी २० कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजची मागणी केली.वर्षभरापूर्र्वी भाजपा व नगर विकास पॅनल यांची युती झाली होती. त्यामुळे आमदार विजय राहंगडाले यांच्या प्रयत्नामुळे गोरेगाव शहराचा कायापालट करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. त्यांच्याच कार्यांना प्रेरित होऊन भारतीय जनता पक्षात पक्षातंर केले आहे.त्यामुळे विकासात्मक कामांना अधिक गती मिळणार आहे. तसेच सबका साथ, सबका विकास व विश्वास या तत्त्वानुसार कामे करणार अशी ग्वाही आशिष बारेवार यांनी दिली आहे.
गोरेगाव शहराच्या विकासासाठी विशेष पॅकेज द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 22:35 IST
गोरेगाव शहरात विविध विकास कामे करण्यासाठी विशेष पॅकेज देण्यात यावे, अशी मागणी नगराध्यक्ष आशिष बारेवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच मुंबई येथे भेट घेऊन केली.
गोरेगाव शहराच्या विकासासाठी विशेष पॅकेज द्या
ठळक मुद्देआशिष बारेवार : मुख्यमंत्र्याची घेतलीे भेट विविध विषयांवर चर्चा