शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

पैसा, बंगला, गाडी द्या अन्‌ नवऱ्याला जणू विकतच घ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:24 IST

नरेश रहिले गोंदिया : समाजातील हुंडा पध्दत मोडली जावी म्हणून ६० वर्षांपूर्वी अंमलात आणलेल्या कायद्याच्या चाकोरीत आजही लोक ...

नरेश रहिले

गोंदिया : समाजातील हुंडा पध्दत मोडली जावी म्हणून ६० वर्षांपूर्वी अंमलात आणलेल्या कायद्याच्या चाकोरीत आजही लोक अडकत आहेत. हुंडा मागणी करणे हा समाजाला लागलेला कलंक मिटविण्यासाठी कडक कायद्याची निर्मिती झाली असली, तरी या कायद्याला न जुमानता हुंडा मागण्याची प्रथा देशात सुरूच आहे. तो हुंडा पैशाच्या रूपाने किंवा साहित्याच्या रूपाने मागितला जात आहे. हुंडा स्वीकारण्याच्या पध्दती बदलल्या आहेत. हुंडा देण्यास मुलीचे वडील सक्षम नसले, तर त्यांच्या मुलीचे लग्न हुंड्यापायी मोडले जात आहे. लग्न करताना नवऱ्यामुलाला जणू मुलीचे वडील हुंडा रूपाने जणू विकतच घेत आहेत.

जिल्ह्यात हुंड्याची परंपरा फारशी नसली, तरीही हुंडा मागत असल्याच्या तक्रारी जिल्हा पोलिसांकडे प्राप्त झाल्या आहेत. भादंविच्या कलम ४९८ अंतर्गत २०१८ मध्ये जिल्ह्यात ४४ गुन्हे, २०१९ मध्ये ३७ गुन्हे, २०२० मध्ये १२ गुन्हे, तर २०२१ मध्ये जूनपर्यंत १५ गुन्हे दाखल आहेत. आम्हाला हुंडा नको, असे म्हणणारी मंडळी आपल्या मुलीला दागिने करून द्या, फ्लॅट द्या, बंगला द्या, फोर व्हीलर-टू व्हीलर द्या, असे मुलीच्या वडिलांना सांगतात. पैसे किंवा साहित्याच्या रूपात हुंडा घेऊन मुलगा स्वत:ला मुलीला विकत असल्याचे चित्र समाजात पाहायला मिळत आहे.

.....................................................

हुंडा म्हणायचा की पोराचा लिलाव?

१) हुंडा म्हणून सरळ पैसे न घेता गाडी, बंगला, फ्लॅट, प्लाॅट, मौल्यवान दागिने मागितले जातात.

२) लग्नात होणारे अवडंबर, मुलाला लग्नात लागणारा खर्चही मुलींच्याच वडिलांकडून घेतला जातो.

३) लग्नात कन्यादानात झालेल्या मुलीच्या पैशांवरही सासरच्या मंडळींची नजर असते.

..................

अशिक्षितांपासून उच्चशिक्षितांपर्यंत...

- मुलाला नोकरीसाठी लागणारे डोनेशन मुलीच्या वडिलांनी द्यावे, व्यवसाय उभा करण्यासाठी लागणारा पैसा मुलीच्या वडिलांनी द्यावा, बहुतांश कुटुंब मौल्यवान वस्तूंच्या रूपात हुंडा घेतात.

- आपला मुलगा किती होतकरू आहे, हे न पाहता गोरगरिबांपासून, गर्भश्रीमंतांपर्यंत आणि अशिक्षितांपासून अगदी उच्चशिक्षितांपर्यंत हुंडा मागितला जातो. अशिक्षितांपेक्षा शिक्षित लोक जास्त हुंडा मागताना दिसतात.

- हुंडा मागण्याचे स्वरूप बदलले आहे. लग्नात होणारा खर्च, डिजेचा खर्च, वरातीला लागणाऱ्या वाहनांचा खर्च, मंगल कार्यालयाचा खर्च मुलीच्याच वडिलांनी सांभाळून मुलाचे भविष्य घडविण्यातही हातभार लावावा, असे सांगितले जाते.

............................

मुलीचे आई-वडीलही जबाबदार

हुंडा मागणारा मुलगा आपल्या मुलीवर प्रेम कसे करेल, त्याला तिच्यावर नाही, तर पैशांवर प्रेम आहे, असे मुलीच्या आई-वडिलांनी समजले पाहिजे. हुंडा मागणाऱ्या मुलाला व त्याच्या कुटुंबियांना तुरुंगाची हवा दाखविणे गरजेचे आहे.

- छाया शंकरलाल नागपुरे, सामाजिक कार्यकर्ता

.............

नवी पिढी बदलतेय....

१) हुंडा घेणाऱ्यांमध्ये उच्चशिक्षितांचा आकडा मोठा आहे. मुलीचे आई-वडील मुलगा पाहताना होतकरू आणि नोकरीवाला पाहतात; परंतु नोकरीवर लागण्यासाठी दिलेला पैसा मुलीच्या वडिलांकडून काढण्याचा अनेकांचा मानस दिसून येतो. हे आता नवीन पिढीने बदलायला हवे.

- राजू पटले, शिक्षक

...........

२) मुलगा नोकरीवर असेल आणि व्यसनाच्या आहारी गेला असेल, तर तो काही कामाचा नाही. मुलगा शोधताना त्याचे कर्तत्व आणि योग्यता या दोन गोष्टी पुढे ठेवून निर्व्यसनी मुलांनाच मुलगी देणे लोक पसंत करीत आहेत. आता नोकरीही त्यांच्या समोर दुय्यम झाली आहे.

- प्रा. अर्चना चिंचाळकर, सामाजिक कार्यकर्ता, आमगाव

....................

सन २०१८-४४

सन २०१९-३७

सन २०२०-१२

सन २०२१-१५