शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

अतिक्रमणधारकांना जमिनीचे पट्टे द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 21:17 IST

अतिक्रमणधारकांना जमिनीचे पट्टे द्या या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियनच्यावतीने २६ फेब्रुवारी रोजी युनियनचे जिल्हा महासचिव शेखर कनोजिया यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देशेतमजूर युनियनची मागणी : उपविभागीय कार्यालयावर मोर्चा व धरणे

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : अतिक्रमणधारकांना जमिनीचे पट्टे द्या या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियनच्यावतीने २६ फेब्रुवारी रोजी युनियनचे जिल्हा महासचिव शेखर कनोजिया यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, संघटनेच्या प्रतिनिधी मंडळाच्यावतीने उपविभागीय अधिकारी रविंद्र राठौड यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.वन अधिकारी कायदा २००६ ते २००८ अंतर्गत दाखल शेतीच्या जमिनीवर अतिक्रमणधारकांना तत्काळ जमिनीचे पट्टे देण्यात यावे व ज्यांना पट्टे देण्यात आले त्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात यावा, मनरेगा कायद्यांतर्गत ग्रामीण बेरोजगारांना एक कुटूंबातील दोन लोकांना काम देण्यात यावे, कामात ४०० रुपये मजूरी देण्यात यावी व प्रत्येक आठवड्यात वेतन देण्यात यावे, ग्रामीण बेरोजगारांचे पलायन थांबविण्यात यावे. प्रत्येक गरजू कुटूंबाला वाढत्या महागाईला पाहता ५ लाख रुपयांचे घरकूल बनवून देण्यात यावे, निराधारांसाठी मानधन नको कायदा करण्यात यावा, १००० रुपये मानधन दरमहा देण्याची चोख व्यवस्था करण्यात यावी व निराधाराची ६५ वर्ष ऐवजी ६० वर्षाची अट निश्चित करण्यात यावी, सर्व रेशनकार्डधारकांंना ३५ किलो रेशन स्वस्त दरात देण्यात यावे, दुकान गाळे वाटपात झालेल्या भ्रष्ट कारभाराची तत्काळ चौकशी व दोषीवर कडक कार्यवाही करावी इत्यादी मागण्यांसाठी हा मोर्चा व धरणे आंदोलन करण्यात आले.त्यानंतर, राणी दुर्गावती चौकात जाहीर सभा घेण्यात आली. त्यात सर्वप्रथम काश्मिरच्या पुलवामामध्ये झालेल्या आंतकवादी हल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली देण्यात आली. नंतर सभेला शेखर कनोजिया शेतमजूर युनियनचे जिल्हा महासचिव यांनी संबोधीत केले. अध्यक्षस्थानी बाबुराव राऊत होते.संचालन समीर उजवणे यांनी केले. आभार संजय लांडेकर यांनी मानले. मोर्चा आंदोलनासाठी शकील शेख, प्रेमदास चौरे, रेखा ताराम, सूरजा सयाम, पुष्पा परतेकी, जाफर रहिम शेख, लालदास चवरे, मोतीराम रहिले यांच्यासह युनियनच्या सदस्यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणagricultureशेती