लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : दुष्काळसदृश परिस्थितीत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कुटुंबाला १०० दिवस कामाऐवजी कुटुंबातील प्रत्येक कमावत्या व्यक्तीला शंभर दिवस काम देण्यात यावे. अशी मागणी सरपंचानी उपविभागीय अधिकारी व आ. विजय रहांगडाले यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.तिरोडा तालुक्यात यावर्षी यावर्षी कमी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांवर पिके गमविण्याची पाळी आली. परिणामी शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी व शेतकऱ्यांच्या हाताला काम मिळावे यासाठी महाराष्ट्र शासनाकडून प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला शंभर दिवस कामे दिले जात आहे. सदर कामावर एका कुटुंबाला १०० दिवस कामाप्रमाणे मिळणाऱ्यां मजुरीत शेतकरी, शेतमजुर यांना कुटुंबाचा उदरनिवार्ह करणे शक्य नाही. त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक कमवित्या व्यक्तीस काम दिल्यास आर्थिक प्रश्न दूर करण्यास मदत होईल. स्मशान शेड बांधकाम, सिमेंट रस्ता बांधकाम, नाली बांधकाम, सौंदर्यीकरण, पाणघाट, इत्यादी कामे एमआरईजीएस अंतर्गत घेण्यात करुन त्यासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा. अशी मागणी या वेळी दिलेल्या निवेदनातून केली आहे. शिष्टमंडळात सरपंच तिरुपती राणे, प्रकाश भोंगाडे, रामकिशोर ठाकूर, कमलेश आतिलकर, स्वप्नील बन्सोड, गौरीशंकर टेंभरे, गुलाब कटरे, छत्रपती बोपचे, तुमेश्वरी बघेले, गजानन पारधी, मंगला येवले, तेजेश्वरी कटरे, वनिता नागपुरे, सरिता राणे, मुकेश रहांगडाले, तिलोत्तमा चौरे, अनिल बोपचे, सुरेशा पटले, मिलन पटले, दुर्गा नागदेवे, प्रेमकुमार कटरे, भारत चौधरी यांचा समावेश होता.
कुटुंबाऐवजी कमावत्या व्यक्तीला शंभर दिवस काम द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 21:45 IST
दुष्काळसदृश परिस्थितीत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कुटुंबाला १०० दिवस कामाऐवजी कुटुंबातील प्रत्येक कमावत्या व्यक्तीला शंभर दिवस काम देण्यात यावे. अशी मागणी सरपंचानी उपविभागीय अधिकारी व आ. विजय रहांगडाले यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
कुटुंबाऐवजी कमावत्या व्यक्तीला शंभर दिवस काम द्या
ठळक मुद्देसरपंचाची मागणी : आमदारांना दिले निवेदन