केशोरी : कोरोना विषाणूच्या वाढलेल्या प्रकोपामुळे महाराष्ट्र शासनाने शाळा-महाविद्यालय बंद करुन पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण न देता वरच्या वर्गात वर्गोन्नती देण्याचे आदेश दिले आहेत. सधन कुटुंबातील पाल्य चांगले शिक्षण मिळावे म्हणून गावाजवळची शाळा सोडून शहरामध्ये जाऊन वसतिगृह किंवा भाड्याने घर घेऊन शिकायला गेली आहेत. सध्या कोरोनाच्या महामारीने ते मूळ गावात येधून राहिली आहेत. त्यांना त्यांच्या गावालगत असणाऱ्या केंद्रामधून दहावी-बारावी बोर्ड परीक्षा देण्याची विभागीय परीक्षा मंडळ नागपूर यांना परवानगी देण्याची मागणी विद्यार्थ्यांसह पालकांनी केली आहे.
महाराष्ट्रात कोरोना वाढीच्या प्रकोपामुळे पहिली ते नववी व अकरावीचे वर्ग बंद करुन थेट वरच्या वर्गात वर्गोन्नती देण्याचे आदेश देऊन इयत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षेचे केंद्र प्रत्येक विद्यार्थी प्रवेशित शाळेत उपकेंद्र निर्माण करुन परीक्षेला प्रविष्ट होण्याची मुभा दिली आहे. मात्र दहावी व बारावीसाठी शहरात जाऊन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात आणि भाड्याने घरात राहणारे विद्यार्थी घरी परत आले आहेत. ते विद्यार्थी शहरात जाऊन परीक्षा देऊ शकत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी विभागीय मंडळाने त्यांच्या गावाजवळील लगतच्या परीक्षा केंद्रावरुन दहावी-बारावीची परीक्षा देण्याची सवलत प्रदान करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालकांनी केली आहे.
कोट
आता कोरोनाच्या प्रभावामुळे शहरात जाऊन आमचे पाल्य परीक्षा देऊ शकत नाही. नागपूर विभागीय मंडळाने गावालगत असलेल्या केंद्रातून विद्यार्थ्यांना प्रविष्ट होण्याची संधी द्यावी.
भगवान गायकवाड, पालक राजोली