शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मेहनतीचा मोबदला द्या हो ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 00:12 IST

शासकीय काम आणि महिनाभर थांब असे विनोदाने म्हटले जाते,मात्र तब्बल वर्षभराचा कालावधी लोटूनही महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावरील २१६ मजुरांना मजुरीचे पैसे मिळाले नाही.

ठळक मुद्देवर्षभरापासून मजुरांची फरफट : मग्रारोहयो योजना

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासकीय काम आणि महिनाभर थांब असे विनोदाने म्हटले जाते,मात्र तब्बल वर्षभराचा कालावधी लोटूनही महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावरील २१६ मजुरांना मजुरीचे पैसे मिळाले नाही. दिवसभर घाम गाळून केलेल्या मेहनतीची मजुरी मिळण्यासाठी ते मागील वर्षभरापासून शासकीय कार्यालयाच्या पायऱ्या झिजवित अधिकाऱ्यांना ‘मेहनतीचा मोबदला द्या हो’ अशी विनंती करीत आहे. मात्र प्रशासनाला अद्यापही पाझर न फुटल्याने त्यांची पायपीट कायम आहे.देशात सर्वाधिक रोजगार देणारा जिल्हा म्हणून गोंदिया जिल्हा प्रशासनाची पाठ नुकतीच थोपाटण्यात आली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी सुध्दा आम्ही कशा उपाय योजना करुन मजुरांना सर्वाधिक कामे उपलब्ध करुन दिली. याचे गोडवे गायले, त्यात काही गैर नाही. मात्र एकीकडे मजुरांना सर्वाधिक कामे उपलब्ध करुन देत असताना दुसरीकडे याच मग्रारोहयोतंर्गत काम केलेल्या २१६ मजुरांना कामाची मजुरी मिळण्यासासाठी वर्षभरापासून पायपीट करावी लागत आहे. ही कुणालाच न पटणारी बाब आहे. सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात सडक अर्जुुनी तालुक्यातील डव्वा येथे मग्रारोहयोतंर्गत जिल्हा परिषद लघू पाटबंधारे विभाग व ग्रामपंचायततर्फे करण्यात आलेल्या कामावर २१६ मजुरांनी काम केले. याला वर्षभराचा कालावधी लोटला मात्र मजुरांना अद्यापही मजुरी मिळाली नाही. हातावर आणून पानावर खाणाºया मजुरांच्या कुटुंबीयांवर मजुरी न मिळाल्याने उपासमारीची पाळी आली आहे. मजुरी मिळावी यासाठी मजुरांनी पंचायत समिती व तहसील कार्यालयाच्या पायऱ्या झिजविल्या. मात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्येकवेळी टोलावाटोलवीचे उत्तर देत त्यांना परतावून लावले. आज ना उद्या मजुरी मिळेल या आशेवर हे मजूर होते. मात्र वर्र्षभराचा कालावधी लोटूनही त्यांना मजुरी न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आली आहे.एकीकडे शासन व प्रशासनातर्फे मग्रारोहयोच्या कामांचा मोठा गाजावाजा केला केला जात आहे. तर दुसरीकडे मात्र या कामावर काम करणाऱ्यांना मजुरीसाठी वर्षभरापासून मेहनतीची मजुरी मिळविण्यासाठी शासकीय कार्यालयाच्या पायºया झिजवाव्या लागत आहेत. मात्र यानंतरही प्रशासनाला पाझर फुटला नसल्याचे चित्र आहे.जि.प.सदस्याचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्रडव्वा येथील मग्रारोहयोच्या कामावरील २१६ मजुरांची थकीत मजुरी त्वरीत देण्यात यावी. यासाठी जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांची भेट घेवून या मजुरांच्या मजुरीचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. या संबंधीचे पत्र सुध्दा त्यांना दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी मजुरीचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आहे.