शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना १८ हजार मानधन द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 21:01 IST

शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या प्रती माह १८ हजार रुपये मानधन देण्यात यावे. तसेच या कर्मचाºयांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सोयी सुविधा लागू करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन (आयटक) च्या नवेगावबांध येथे पार पडलेल्या अधिवेशनात करण्यात आली.

ठळक मुद्देअधिवेशनात मंथन : कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या प्रती माह १८ हजार रुपये मानधन देण्यात यावे. तसेच या कर्मचाºयांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सोयी सुविधा लागू करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन (आयटक) च्या नवेगावबांध येथे पार पडलेल्या अधिवेशनात करण्यात आली.महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन (आयटक) चे जिल्हा अधिवेशन रविवारी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथे पार पडले. अध्यक्षस्थानी ललीता राऊत होत्या.या वेळी युनियनचे राज्य उपाध्यक्ष शिवकुमार गणविर, आयटकचे जिल्हा सचिव रामचंद्र पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे मिलिंद गणविर, सहसचिव सुनील गणविर, नुरखा पठान, रंजिकिरण मेश्राम, अशोक बागडे उपस्थित होते.सचिव करूणा गणविर यांनी कामगारांची स्थिती, कार्यस्थळावर अतिरिक्त कामे, आर्थिक शोषण, मानधन व जिल्हा युनियनच्या संघटनात्मक स्थितीचा अहवाल सादर केला. शालेय पोषण आहार कर्मचाºयांना १८ हजार रुपये मानधन, पेशंन आणि इतर सोयी सुविधा देण्यात याव्या या मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनाची माहिती शिवकुमार गवविर यांनी दिली.राज्य सरकारने शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मानधनात ५०० रुपयांची तुटपुंजी मानधन वाढ केली याचा या वेळी निषेध करण्यात आला. राज्य शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार कर्मचाऱ्यांना ५ हजार रुपये वाढीव मानधन देण्याची मागणी केली. अधिवेशनाच्या शेवटी नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली.अध्यक्षस्थानी ललिता राऊत, कार्याध्यक्ष रामचंद्र पाटील, उपाध्यक्ष ओमेश्वरी पटले, उपाध्यक्ष अशोक बागडे, सचिव करुणा गणविर, सहसचिव रेखा मेश्राम, गिता नागोसे, मिलिंद गणविर, कोषाध्यक्ष धन्नू उईके, सदस्य रमेश पाटणकर, जिवन पुणेकर, ललिता कवरे, धनवंता कोहळे, कविता किरणापूरे, मंगला ठाकरे यांची निवड करण्यात आली.

टॅग्स :Schoolशाळा