गोंदिया : आई-वडिलांना न जुमानता प्रेम विवाह करणाऱ्या तरुणीला वडील व एका नातेवाईकाने शनिवारच्या दुपारी ४ वाजता आमगाव तालुक्याच्या मानेगाव येथे मारहाण केली. गोरेगाव तालुक्याच्या इसाटोला येथील प्रेमलता अनंतराम येल्ले (२०) या मुलीने प्रेमविवाह केल्यामुळे संतप्त झालेले वडील अनंतराम गोमाजी येल्ले (५२) व सेवकराम चिंतामन लामकासे (४०) या दोघांनी शनिवारी मानेगाव येथे जावून त्या मुलीला विटाने मारुन गंभीर जखमी केले. प्रेमविवाहास आईवडीलांचा विरोध असताना त्या तरुणीने आई-वडीलांची तमा न बाळगता प्रेमविवाह केला. या घटनेसंदर्भात आमगाव पोलिसांनी दोन्ही आरोपींवर भादंवि कलम ३२४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आंतरजातिय विवाहाला शासनाने प्राधान्य दिले. प्रेमविवाह तंटामुक्त समित्यांनी घडवून आणले तरीही या प्रेमविरांच्या विरोधात आजही समाजमन आहे. (तालुका प्रतिनिधी)
प्रेमविवाह करणाऱ्या तरुणीला मारहाण
By admin | Updated: November 7, 2016 00:15 IST