शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

समाजोपयोगी उपक्रमातून मिळते दिशा

By admin | Updated: July 3, 2016 01:50 IST

लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे समाजऋण फेडण्यासाठी नेहमीच अनेक उपक्रमांचे आयोजन केले जाते.

जवाहरलालजी दर्डा यांची जयंती : ५१ जणांचे उत्स्फूर्तपणे रक्तदानगोंदिया : लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे समाजऋण फेडण्यासाठी नेहमीच अनेक उपक्रमांचे आयोजन केले जाते. समाजाला दिशा देणाऱ्या उपक्रमांची अंलबजावणी करण्यात लोकमत अग्रेसर असते. अशा उपक्रमातून समाजाला दिशाचे काम हे वृत्तपत्र करीत असल्याचे उद्गार जि.प. अध्यक्ष उषाताई मेंढे यांनी काढले.जेष्ठ स्वातंत्र संग्राम सेनानी, माजी उद्योग व आरोग्यमंत्री तथा लोकमतचे संस्थापक संपादक स्व.जवाहरलालजी दर्डा (बाबूजी) यांच्या जयंतीनिमीत्त लोकमत समूहातर्फे स्थानिक सुभाष बागेत शनिवारी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचे उद्घाटन जि.प. अध्यक्ष उषाताई मेंढे यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस उपअधिक्षक (गृह) सुरेश भवर यांनी केले. यावेळी भवर म्हणाले, रक्तदान महादान आहे. सर्वात श्रेष्ठ दान समजल्या जाणाऱ्या या दानात प्रत्येकाने दान करावे, असे आवाहन करीत ‘दान दिये, धन ना घटे, गंगा घटे ना नीर, ऐसी दया किजीऐ कह गये संत कबीर’ या म्हणीची आठवण त्यांनी करून दिली. कार्यक्रमाला अतिथी म्हणून आयुष रक्त संक्रमण पेढी नागपूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ.रवी भांगे, श्रेयश शहारे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात बाबुजी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी उपअधिक्षक सुरेश भवर यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून रक्तदान शिबिराला सुरूवात केली. या शिबिरात महाविद्यालयीन विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, कर्मचारी, अधिकारी यांनी रक्तदान केले. कार्यक्रमाचे संचालन सहायक उपसंपादक नरेश रहिले, प्रास्ताविक लोकमत इव्हेन्टच्या संयोजिका दिव्या भगत यांनी तर आभार कार्यालय प्रमुख मिलींद वाढई यांनी मानले. कार्यक्रमासाठी बाल मंच संयोजक श्रीकांत पिल्लेवार, अतूल कडू, पंकज दमधर, संतोष बिलोने, आशिष तलमले, आदर्श गडपायले, निखील तितरमारे, सी. जे. पटले, विजय पटले, कंचन अडवानी यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)यांनी केले रक्तदानपोलीस उपध्ीाक्षक (गृह) सुरेश भवर, श्रीकांत राऊत, संजय शेंडे, रवि कावळे, अश्विन मेश्राम, प्रविण मिश्रा, अनुपम ठाकुर, राहुल चौधरी, हितेश बारईवार, भारती पंधरे, लिखेंद्र बोपचे, शिवा मिश्रा, नितीन आडे, ज्ञानेश्वर भांडारकर, कृष्णकुमार कठाणे, अनुराग बोपचे, हर्षा धोंगडे, गौरव भालाधरे, राजेंद्र तरारे, अतुल धांडे, जितेश मानकर, राजेश भोयर, रोहन मानकर, पल्लवी भालाधरे, नेहा भालाधरे, वर्षा नंदेश्वर, स्वप्नील गजभिये, जयराम मगर, डॉ. गणेश बाहेती व इतर महाविद्यालयीन युवकांनी रक्तदान केले.