शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

पायाभूत सर्वेक्षणाचे काम वेळेत करा

By admin | Updated: September 3, 2015 01:34 IST

शौचालय प्रत्येक व्यक्तीसाठी गरजेचे आहे. शौचालयासाठी शासनातर्फे अनुदान दिले जाते.

पुराम यांचे आवाहन : शासनाचा लाभार्थ्यांसाठी कालबद्ध कार्यक्रमगोंदिया : शौचालय प्रत्येक व्यक्तीसाठी गरजेचे आहे. शौचालयासाठी शासनातर्फे अनुदान दिले जाते. मात्र अनुदान देताना पायाभूत सर्वेक्षणाचा आधार घेतला जातो. शौचालय बांधकामाचा लाभ घेण्यासाठी गावकऱ्यांनी पायाभूत सर्वेक्षणात आपली अद्ययावत माहिती द्यावी तसेच ग्राम सेवकांनी पायाभूत सर्वेक्षणाचे कार्य नियोजित वेळेत पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या ग्राम पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.एन. पुराम यांनी केले. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात नव्याने निर्माण झालेल्या कुटुंबाचे पायाभूत सर्वेक्षण अद्ययावत करण्याच्या सूचना पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातर्फे देण्यात आल्या आहेत. १ ते २७ सप्टेंबर या कालावधीत पायाभूत सर्वेक्षणाचे कार्य पूर्ण करण्यात येणार आहे. ग्राम पंचायत स्तरावर ही प्रक्रिया ८ सप्टेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश आहेत. त्यासाठी जिल्हा पाणी व स्वच्छता कक्षातील सर्व तज्ज्ञांकडून पंचायत समिती स्तरावर ग्राम सेवकांच्या बैठका घेण्यात येत असल्याची माहिती पुराम यांनी दिली. निर्मल भारत अभियांतर्गत सन २०१२ मध्ये जिल्ह्यातील प्रत्येक ग्राम पंचायतीत पायाभूत सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणानुसारच वैयक्तिक शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. ते उद्दिष्ट आजपर्यंत नव्याने निर्माण झालेले कुटुंब शासनाच्या या योजनेतून सुटू नये म्हणून पायाभूत सर्वेक्षणाचा हा कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ८ सप्टेंबरला ग्राम पंचायतीत ग्रामसभा घेऊन वाढिव कुटुंबाची नोंद विहित प्रपत्रात करायची आहे. १३ सप्टेंबर पर्यंत वाढीव कुटुंबाचे माहितीचे एकत्रीकरण करुन त्याचा गोषवारा तयार करायचा आहे. १९ सप्टेंबर पर्यंत जिल्हा स्तरावर माहिती एकत्रित करुन विभागाला सादर करायची आहे. ही माहिती विभाग स्तरावररुन शासनाला जाणार आहे. ग्राम पंचायत व पंचायत समितीने वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करायचे आहे. सन २०१२ च्या पायाभूत सर्वेक्षणात ज्या कुटुंबाची नावे सुटली होती. त्या कुटुंबानी ८ सप्टेंबर पूर्वी ग्राम पंचायतीत आपले नाव नोंदवावे असे आवाहनही पुराम यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)