शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

अर्धवट रोडचे काम त्वरित पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:29 IST

सडक अर्जुनी : सडक अर्जुनी ते रेंगेपार शेंडा रस्त्याचे अर्धवट काम झाल्यामुळे अनेक नागरिकांना याचा फटका बसत आहे. त्या ...

सडक अर्जुनी : सडक अर्जुनी ते रेंगेपार शेंडा रस्त्याचे अर्धवट काम झाल्यामुळे अनेक नागरिकांना याचा फटका बसत आहे. त्या रस्त्यावर नियमित अपघात होत असल्यामुळे, या समस्याग्रस्त अर्धवट रस्त्याचे काम त्वरित करण्यात यावे, या मागणीचे निवेदन सडक अर्जुनी तालुका राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे तहसीलदारांना देण्यात आले.

सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. २ गोंदिया यांचे नियंत्रणात या रस्ताचे काम सुरू असून, कंत्राटदार मेसर्स अताशा आशीर्वाद बिल्डर्स नागपूर यांच्या नावाने आहे. या बांधकामाचा कार्यारंभ आदेश १४ नोव्हेंबर, २०१८ला देण्यात आला असून, काम पूर्ण करण्याचा कालावधी १३ नोव्हेंबर, २०२० होता. बांधकामाची किमत २८ कोटी असून, आतापर्यंत फक्त २० टक्के काम झालेले आहे. ८० टक्के काम हे शिल्लक असून, सद्यस्थितीत बांधकाम बंद आहे. सडक अर्जुनी ते शेंडा रस्ता हा सडक अर्जुनी तालुक्यातील मुख्य रस्ता असून, या रस्त्यालगत जवळ १५ गावे जोडल्या गेली आहे. रस्ता दुरुस्तीच्या नावाने संपूर्ण रस्ता खोदण्यात आला आहे. अनेक ठिकाणी केवळ गिट्टी पसरलेली आहे. त्यामुळे कोणतेही वाहन चालविणे म्हणजे एक प्रकारची तारेवरची कसरत करावी लागते. या रस्त्याने साधे पायी चालनेही शक्य नाही. त्यामुळे अर्धवट काम कंत्राटदारांनी त्वरित पूर्ण करावे, या मागणीचे निवेदन तालुका राष्ट्रवादीच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बांधकाममंत्री अशोक चव्हाण, पालकमंत्री नवाब मलीक, खासदार प्रफुल पटेल, जिल्हाधिकारी, सचिव बांधकाम विभाग मुंबई, मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम नागपूर यांना पाठविण्यात आले आहे. शिष्टमंडळात राकाँ. तालुकाध्यक्ष डॉ.अविनाश काशिवार, शहर अध्यक्ष प्रियंक उजवने, महिला तालुका अध्यक्षा रजनी गिऱ्हेपुंजे, माजी नगराध्यक्ष देवचंद तरोणे, माजी नगराध्यक्ष शशीकला टेंभुर्णे, माजी नगरसेवक दिलीप गभणे, अल्पसंख्याक सेल अध्यक्ष मतीन शेख, माजी पं.स. सभापती वंदना डोंगरवार, मोहनकुमार शर्मा, ओमप्रकाश टेंभुर्णे, समीक्षा उदापुरे, सुबूर सौदागर, सारिका मसराम, दीक्षा भगत, अफरोज शेख, फारुक शेख, अतुल फुले, विनोद जगताप, के.बी.चव्हाण, सदाराम लाडे यांचा समावेश होता.