शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

स्वातंत्र्यानंतरच्या मोठ्या लढ्यासाठी सज्ज व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 23:47 IST

आरक्षणाची मर्यादा ५० टक्यापर्यंत ठेवणे आणि त्यापेक्षा अधिकच्या आरक्षणाला हटविण्याच्या मागणीला घेऊन एससी, एसटी, ओबीसी व अल्पसंख्यांक नागरिकांनी‘आम्ही जिवंत आहोत’या नावावर शहरात शनिवारी (दि.१०) जनआक्रोश रॅली काढली.

ठळक मुद्देजनआक्रोश रॅली। ५८ संघटनांचा सहभाग, विविध मान्यवरांनी केले मार्गदर्शन, लोकशाही वाचवा, देश वाचवाचा नारा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आरक्षणाची मर्यादा ५० टक्यापर्यंत ठेवणे आणि त्यापेक्षा अधिकच्या आरक्षणाला हटविण्याच्या मागणीला घेऊन एससी, एसटी, ओबीसी व अल्पसंख्यांक नागरिकांनी‘आम्ही जिवंत आहोत’या नावावर शहरात शनिवारी (दि.१०) जनआक्रोश रॅली काढली. जय ओबीसी, लोकशाही वाचवा देश वाचवा, संविधान वाचवा-देश वाचवा, अशा घोषणा देत शहराच्या विविध मार्गावरून जनआक्रोशन रॅली काढण्यात आली.शहराच्या इंदिरा गांधी स्टेडियम परिसरातून दुपारी १ वाजता रॅली काढण्यात आली. या रॅलीत विविध ५२ संघटनांनी सहभाग घेतला.रॅलीचे नेतृत्त्व जि.प. अध्यक्ष सीमा मडावी, आदिवासी नेता डॉ.नामदेव किरसान,धनराज तुमडाम, जुबेर, मेहताबभाई, बलीराज धोटे, ओबीसी नेता श्रावण कटरे, युवा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष जितेश राणे, जीवन शरणागत, आम आदमी पक्षाचे पुरुषोत्तम मोदी, वंचित बहुजन आघाडीचे प्रा.सतीश बंसोड, नंदूरकर, समता संग्राम परिषदेचे विनोद मेश्राम, राजू राहुलकर, मराठा सेवा संघाचे क्रांती ब्राह्मणकर, संभाजी ब्रिगेडच्या सविता बेदरकर, भाकपचे हौसलाल रहांगडाले, मिलिंद गणवीर, ओबीसी संघटनेचे कैलास भेलावे, सचिन रहांगडाले,विकास लिल्हारे,प्रदीप राठोड,प्रमिला सिंद्रामे,गोपाल उईके, बसपाचे दिनेश गेडाम, प्रेम साठवने, आरती चवारे, निलेश देशभ्रतार, सुनील भोंगाडे, उत्तम यादव, राजीव ठकरेले यांनी केले. रॅली नेहरु चौक, गोरेलाल चौक, गांधी प्रतिमा, जयस्तंभ चौक मार्गे इंदिरा गांधी स्टेडियम येथे पोहचल्यावर रॅलीचे सभेत रूपांतर झाले.एससी,एसटी, ओबीसी व इतर समाजाला आता लढाईसाठी सज्ज व्हावे लागेल. गोंदियानंतर देशात ही लढाई लढण्यात येईल.सभेच्या प्रास्तविकातून संविधान मैत्री संघाच्या पौर्णिमा नागदेवे यांनी सांगितले की, समाजातील विविध घटकांना जोडण्यासाठी संविधान मैत्री संघाचा मंच उपलब्ध करुन देण्यात आला आहे. उत्तम यादव म्हणाले, ईव्हीएमच्या नावावर भ्रमीत करून सत्ता काबीज करण्यात आली. व्हीव्हीपॅटची १०० टक्के स्लीप मोजून दाखविल्यास निकाल काही वेगळाच असेल असे सांगितले.मेहताबभाई म्हणाले, सरकारला जागविण्यासाठी असे आंदोलन व्हायला हवे.संविधान वाचविण्याची जवाबदारी कोण्या एका व्यक्तीची नसून संपूर्ण ८० टक्के समाजाची आहे. पुरुषोत्तम मोदी म्हणाले, जे लोक जिवंत आहेत ते लोक आंदोलनात दिसत आहेत. वास्तविकतेत विविध जातींना आपल्या घरातच ठेवून मानवतेची लढाई लढावी लागेल.सविता बेदरकर म्हणाल्या उन्नाव प्रकराने खरा चेहरा समोर आला. आम्ही शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन पुढे चालत आहोत असे सांगितले. जितेश राणे म्हणाले, मुख्यमंत्री यांच्या दौऱ्याप्रसंगी ओबीसी समाजाच्या नेत्यांना रात्रीच नजरकैदेत ठेवले. हा महाराष्टÑ सरकारचा खरा चेहरा आहे. संचालन शिव नागपुरे, सुनील पटले तर आभार अतुल सतदेवे यांनी मानले.

टॅग्स :Morchaमोर्चा