शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बालकल्याण सभापतींचे राकाँ सदस्यांना ‘गेट आऊट’

By admin | Updated: September 9, 2016 01:53 IST

जिल्हा परिषदेत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एखादे प्रकरण चर्चेला आणल्यास त्याचे निराकरण न करता सदस्याला अपमानास्पद वागणूक देण्याचा प्रकार घडत आहे.

सदस्यांत असंतोष : पदाचा दुरूपयोग केल्याचा आरोपगोंदिया : जिल्हा परिषदेत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एखादे प्रकरण चर्चेला आणल्यास त्याचे निराकरण न करता सदस्याला अपमानास्पद वागणूक देण्याचा प्रकार घडत आहे. यातून गुरूवारी महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीमध्ये सभापती विमल नागपुरे यांनी चक्क राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या समिती सदस्य खुशबू जितेश टेंभरे, ललिता चौरागडे, सुनिता मडावी यांना बैठकीतून ‘गेट आऊट’ म्हणून सभेबाहेर जाण्याचे निर्देश दिले. या प्रकारामुळे सदस्यांमध्ये चांगलाच असंतोष पसरला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या समिती सदस्यांनी गैरकारभाराचा पाढा वाचून सभागृह सोडले व संबंधित सभापतीवर पदाचा दुरूपयोग केल्याप्रकरणी तातडीने कारवाई करावी अशी लेखी तक्रार आयुक्त नागपूर विभाग यांच्याकडे केली. या प्रकाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या समिती सदस्य खुशबू जितेश टेंभरे, ललिता चौरागडे, सुनिता मडावी यांनी केली आहे. महिला बालकल्याण समितीची बैठक दुपारी १ वाजता आयोजित केली होती. परंतु सदर बैठक ठरल्याप्रमाणे १ वाजता न घेता सकाळी ११ वाजता सभापती विमल नागपुरे यांच्या कक्षात घेण्यात येत असल्याचे दुरध्वनीवरून कळविण्यात आले. सभेची कार्यवाही सुरू होताच समिती सदस्य खुशबू टेंभरे यांनी वेळ बदलण्याचे कारण आणि नोटीसमधील नमुना अ जोडपत्रात उल्लेखीत करण्यात आलेल्या काम काजाबाबत समितीचे सचिव उपमुख्य कार्यकारी अधिकारी अंबादे यांना काही प्रश्नांचे उत्तर मागितले. मात्र त्याचे उत्तर मिळण्यापूर्वीच सभापती नागपुरे यांनी सदस्यांंना तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही असे म्हणून ‘गेट आऊट’ म्हटले. यावर सदस्यांनी आमच्या अधिकारावर तुम्ही गदा आणू शकत नाही, असे सांगून कारभारावर ताशेरे ओढले व बैठकीतून बहिर्गमन केले.मागील सर्वसाधारण सभेमध्ये खुशबू टेंभरे यांनी व इतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला सदस्यांनी आलमारी व इतर साहित्य खरीदी करण्यासाठी आलेला निधीबाबत विचारणा केली होती, तेव्हापासून सभापती नागपुरे यांनी सदस्यांचा राग धरल्याचे म्हटले जाते. याबाबत त्यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही. (जिल्हा प्रतिनिधी)