शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

आधुनिक पद्धतीची शेती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 23:58 IST

कमी पाण्याच्या पिकांची शेती, फलोत्पादनाची शेती, फुलांची शेती करुन आपली आर्थिक परिस्थिती मजूबत करा. आधुनिक पद्धतीची शेती केल्यानेच आपल्या आर्थिक परिस्थितीत बदल घडू शकेल, .....

ठळक मुद्देरवींद्र ठाकरे : सेरपार येथे गुडमॉर्निंग पथक, हागणदारीमुक्तीवर मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : कमी पाण्याच्या पिकांची शेती, फलोत्पादनाची शेती, फुलांची शेती करुन आपली आर्थिक परिस्थिती मजूबत करा. आधुनिक पद्धतीची शेती केल्यानेच आपल्या आर्थिक परिस्थितीत बदल घडू शकेल, असे प्रतिपादन जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले.देवरी तालुक्यातील लगतच्या सेरपार येथे गुडमॉर्निंग पथकातंर्गत मुख्य कार्यपालन अधिकारी ठाकरे यांनी भेट दिली. दरम्यान घेण्यात आलेल्या सभेत उपस्थित शेतकºयांना पर्यावरण व जलसंवर्धनाचे महत्व सांगताना ते बोलत होते.या वेळी उपमुख्य कार्यकारी (स्वच्छता) अधिकार राठोड, खंडविकास अधिकारी मनोजकुमार हिरुडकर, माजी जि.प. सदस्य राजेश चांदेवार, दिनबंधू, ग्रामीण विकास संस्था देवरीचे अध्यक्ष कुलदीप लांजेवार, पशुधन विकास अधिकारी डॉ. विजय कोठेकर यांच्यासह पंचायत समितीच्या सर्व विभागाचे कर्मचारी, ग्रामसेवक, शिक्षक, रोजगार सेवक व अंगणवाडी सेविका यांचा समावेश होता. दरम्यान उपमुख्य कार्यपालन अधिकारी राठोड यांनी गावातील व्यक्तिगत शौचालय कशासाठी, यावर मार्गदर्शन केले. आपले गाव स्वच्छ, सुंदर बनविण्यासाठी ग्रामवासीयांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.जिल्ह्यातील प्रत्येक भागातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ रहावे. संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त व्हावा. यासाठी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे संपूर्ण जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत पहाटेच्या सुमारास गावागावांत जाऊन गुडमॉर्निंग पथकाच्या माध्यमातून ग्राम स्वच्छता व शौचालयाचे महत्त्व सांगत आहेत. स्वयंप्रेरणेने शासनाची कुठलीही मदत न घेता शौचालय बांधण्यास नागरिकांंना तयार करीत आहेत. जिल्हा संपूर्णत: हागणदारीमुक्त होण्याच्या मार्गावर आहे. एवढेच नाही तर उघड्यावर शौचास गेल्याने आरोग्यावर काय दुष्परिणाम होतात, यासह कायदेशीर दंडास आपण कसे बळी पडतो, यावरही मार्गदर्शन करण्यात आले.तसेच तालुक्यातील प्रत्येक शेतकºयाचे, कुटुंबप्रमुखाचे आर्थिक उत्पन्न कसे वाढेल, यावरही मार्गदर्शन करण्यात आले. संचालन ग्रामसेवक बंसोड यांनी केले.आभार कुलदीप लांजेवार यांनी मानले. कार्यक्रमासाठी विस्तार अधिकारी पराते, ग्रामसेवक संजय कडव, कटरे, दरवडे, अंबादे, रामटेके, मेश्राम, देशमुख, वैष्णव, चौधरी, कृषी तांत्रिक संजय डोये यांनी सहकार्य केले.