शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भसह 15 गाड्यांमध्ये मिळणार जनरल तिकीट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2022 05:00 IST

रेल्वे बोर्डाने जनरल तिकीट विक्री सुरू करण्याचे निर्देश दिले असून यासंबंधीचे आदेशसुद्धा गोंदिया रेल्वे स्थानकाला प्राप्त होणार आहेत. विदर्भ, महाराष्ट्र एक्स्प्रेस, छत्तीसगड एक्स्प्रेससह ज्या गाड्यांचे जनरल डबे आरक्षित करण्यात आले होते, त्या सर्व गाड्यांचे डबे पूर्ववत जनरल केले जाणार आहेत. मात्र यासाठी प्रवाशांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षांपासून जनरल तिकीट विक्री बंद आहे, तर लोकल आणि पॅसेंजर गाड्यासुद्धा पूर्ववत सुरू झालेल्या नाहीत. पण आता कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असून सर्वच व्यवहारदेखील सुरळीत झाले आहेत. त्यामुळे रेल्वे विभागानेसुद्धा बंद केलेल्या सुविधा पूर्ववत करण्यास सुरुवात केली आहे. रेल्वे बोर्डाने जनरल तिकीट विक्री सुरू करण्याचे निर्देश दिले असून यासंबंधीचे आदेशसुद्धा गोंदिया रेल्वे स्थानकाला प्राप्त होणार आहेत. विदर्भ, महाराष्ट्र एक्स्प्रेस, छत्तीसगड एक्स्प्रेससह ज्या गाड्यांचे जनरल डबे आरक्षित करण्यात आले होते, त्या सर्व गाड्यांचे डबे पूर्ववत जनरल केले जाणार आहेत. मात्र यासाठी प्रवाशांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण जनरल तिकीट विक्री बंद असल्याने अनेकांनी तिकीट आरक्षित केले आहे. त्यामुळे हा आरक्षित तिकिटांचा कोटा पूर्ण संपल्यानंतर या गाड्यांसाठी जनरल तिकीट विक्री सुरू केली जाणार आहे. त्यामुळे तब्बल दोन वर्षांच्या कालावधीनंतर सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. 

दोन वर्षांपासून आर्थिक फटका - कोरोनाच्या संसर्गामुळे मागील दोन वर्षांपासून रेल्वे जनरल तिकिटांची विक्री व लोकल आणि पॅसेंजर गाड्या बंद केल्या होत्या. त्या अद्यापही पूर्ववत केल्या नाही. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना मागील दोन वर्षांपासून आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. 

जनरल तिकीट या गाड्यांमध्ये मिळणार - विदर्भ, महाराष्ट्र एक्स्प्रेस, छत्तीसगड एक्स्प्रेससह ज्या गाड्यांचे जनरल डबे आरक्षित करण्यात आले होते, ते पूर्ववत जनरल केले जाणार असून या गाड्यांसाठी जनरल तिकिटांची विक्री सुरू केली जाणार आहे. त्यासाठीची प्रक्रियासद्धा रेल्वे विभागाने सुरू केली आहे. या गाड्यांमध्ये मिळणार नाही- ज्या गाड्यांना जनरल डबे जोडलेले नाही शिवाय त्यांच्यासाठी पूर्वीदेखील जनरल तिकीट लागू नव्हते, त्या गाड्यांसाठी जनरल तिकीट यापुढेदेखील लागू असणार नाही. त्यामुळे प्रवाशांना याची काळजी घ्यावी लागणार आहे. 

बोर्डाने दिली हिरवी झेंडी रेल्वे स्थानकावरून जनरल तिकिटांची विक्री पूर्ववत सुरू करण्याचे निर्देश रेल्वे बोर्डाने दिले आहेत. यासंबंधीचे पत्रसुद्धा पात्र झाले आहे. पण आरक्षित तिकिटांचा कोटा पूर्ण झाल्यानंतर ही सुविधा सुरू केली जाणार आहे. - ए.के. राय, जनसंपर्क अधिकारी रेल्वे

प्रवासी म्हणतात.....कोरोनाचे कारण पुढे करत रेल्वे मागील दोन वर्षांपासून लोकल, पॅसेंजर बंद करून केवळ विशेष गाड्या सुरू ठेवल्या होत्या. त्यामुळे तिकिटाचा आर्थिक भुर्दंड सर्वसामान्य प्रवाशांना सहन करावा लागला. अद्यापही एमएसटीसह इतर सुविधा पूर्ववत केलेल्या नाही. - दिनेश राऊत, प्रवासी

जनरल तिकीट विक्री बंद असल्याने प्रवासासाठी तिकीट आरक्षित करावी लागत आहे. यामुळे आर्थिक भुर्दंड बसत आहे तसेच बरेचदा कन्फर्म तिकीट मिळत नसल्याने विनातिकीट दंड भरून प्रवास करावा लागत आहे.- रमाकांत कामडी, प्रवासी

 

टॅग्स :railwayरेल्वे