शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल दोन वर्षांनंतर जनरल तिकीट विक्रीला झाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2022 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रेल्वेने अनेक गाड्या बंद करीत केवळ विशेष गाड्या सुरू ठेवल्या होत्या. ...

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रेल्वेने अनेक गाड्या बंद करीत केवळ विशेष गाड्या सुरू ठेवल्या होत्या. तसेच  जनरल तिकीट विक्रीसुद्धा बंद केली होती. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. तब्बल दोन वर्षांच्या कालावधीनंतर आता रेल्वे जनरल तिकीट बंद केलेल्या गाड्यांमध्ये पुन्हा ही सुविधा १ जूनपासून सुरू केली आहे. यासंबंधीचे पत्रही गोंदिया रेल्वे स्थानकाला प्राप्त झाले आहे. पॅसेंजर, लोकल गाड्यांना एक्सप्रेसचा तर एक्सप्रेस गाड्यांना विशेष गाड्यांचा दर्जा देत या गाड्यांमधील जनरल डब्बे रद्द करून जनरल तिकीट विक्री मागील दोन वर्षांपासून बंद केली होती. त्यामुळे प्रवाशांना तिकीट आरक्षित करून या गाड्यांमधून  प्रवास करावा लागत आहे. मात्र, जनरल तिकीट विक्री बंद असल्याने गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांना याचा आर्थिक  भुर्दंड सहन करावा लागत होता. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येऊन बराच कालावधी लोटला असून सर्वच व्यवहार आता पूर्वपदावर आले आहेत. रेल्वेचे वेळापत्रकसुद्धा पूर्वपदावर आले आहे. त्यामुळे जनरल तिकीट विक्री पूर्ववत सुरू करण्याची  मागणी प्रवाशांकडून केली जात होती. मात्र, काही गाड्यांमध्ये ३१ मे पर्यंत तिकीट आरक्षित असल्याने रेल्वे विभागाने १  जूनपासून जनरल तिकीट विक्री सुरू करण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार १ जूनला रेल्वे विभागाने जनरल तिकीट विक्री सुरू करण्याचे पत्र काढले आहे. त्यामुळे तब्बल दोन वर्षांच्या कालावधीनंतर प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. 

पहिल्या टप्प्यात ७० गाड्यांमध्ये जनरल डब्बे- रेल्वे विभागाने पहिल्या टप्प्यात ७० गाड्यांमध्ये जनरल तिकीट विक्री सुरू करण्याची यादी जाहीर केली आहे. काही गाड्यांमध्ये जून महिन्यापर्यंत तिकीट आरक्षित केले असल्याने जूननंतर या गाड्यांमध्येसुद्धा जनरल तिकीट घेऊन प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. 

 सवलतींसाठी करावी लागणार प्रतीक्षा - रेल्वे विभागाने ज्येष्ठ, विद्यार्थी, शिक्षक, रुग्ण, पत्रकार यांना रेल्वे प्रवासात सवलत दिली होती. मात्र, कोरोनामुळे या सर्व सवलती बंद केल्या. त्या अद्यापही पूर्ववत केल्या नसून १ जुलैपासून या सर्व सेवा पूर्ववत करण्याचे संकेत रेल्वे विभागाने दिले आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसह इतरांना सवलतीसाठी पुन्हा महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे.

एमएसटीसाठी करावी लागेल प्रतीक्षा गोंदिया-नागपूर, गोंदिया-चंद्रपूर दररोज अपडाऊन करणाऱ्या प्रवाशांची संख्या तीन हजारांवर आहे. पण दोन वर्षांपासून मासिक सिझन पास (एमएसटी) बंद असल्याने प्रवाशांना दररोज तिकीट काढून प्रवास करावा लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. पण एमएसटीची सुविधा सुरू होण्यास पुन्हा महिनाभर प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

तिकीट दरात होणार बचत - एक्सप्रेस गाड्यांमध्ये जनरल तिकीट विक्री बंद असल्याने प्रवाशांना तिकीट आरक्षित करूनच प्रवास करावा लागत होता. यामुळे दुप्पट पैसे मोजावे लागत होते. मात्र, आता जनरल तिकीट विक्री पूर्ववत सुरू झाल्याने प्रवाशांच्या पैशाची बचत झाली आहे. 

 

टॅग्स :railwayरेल्वे