शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

राजपत्रित वैद्यकीय अधिकार्‍यांचा मूक मोर्चा

By admin | Updated: May 31, 2014 23:34 IST

महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेच्यावतीने (अ)आपल्या विविध मागण्यांसाठी ३१ मे रोजी मूक मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

गोंदिया : महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेच्यावतीने (अ)आपल्या विविध मागण्यांसाठी ३१ मे रोजी मूक मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. सेवा समावेशन झालेल्या वैद्यकीय अधिकार्‍यांना पूर्वलक्ष लाभ देण्यात आला नाही, राज्यातील वैद्यकीय अधिकार्‍यांना सहावा वेतन आयोग लागू झाला नाही, अस्थायी एमबीबीएस, बीएएमएस, बीडीएस वैद्यकीय अधिकार्‍यांना अद्याप स्थायी करण्यात आले नाही, केंद्र शासन व इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील वैद्यकीय अधिकार्‍यांना वेतन दिले जात नाही, कामाचे तास निश्‍चीत नाही. तसेच सेवानवृत्तीचे वय ५८ वरून ६२ वर्षे करण्यात आले नाही आदी मागण्यांना घेऊन संघटनेने धरणे आंदोलन केले. तसेच १ जूनपासून  वैद्यकीय अधिकारी आंदोलनात सहभागी होऊन कामांवर बहिष्कार टाकणार आहेत. २ जूनपासून आझाद मैदान येथे धरणे आंदोलनात सहभागी होणार आहेत. क्षयरोग नियंत्रण कर्मचारी संघटनेच्यावतीने कर्मचार्‍यांना सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. एवढेच नव्हे तर २ जून पासून मॅग्मो (महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना) संघटनेच्या बेमुदत आंदोलनात क्षयरोग नियंत्रण कर्मचारी सहभागी होणार आहे. देताना संघटनेचे अध्यक्ष पवन वासनिक, उपाध्यक्ष योगिता अडसड, सचिव भोजेंद्र बोपचे, कोषाध्यक्ष अमित मंडल व अन्य उपस्थित होते. सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ आरोग्य अधिकारी यांची शिखर संघटना मॅग्मो आहे. या संघटनेने २ जून पासून पुकारलेल्या कामबंद आंदोलनात सार्वजनिक आरोग्य विभागातील वाहन चालक कर्मचारी संघटना सहभाग घेणार आहे. वाहन चालकांची कायम नेमणूक करण्यात यावी मागणीला या आंदोलनाच्या माध्यमातून उचलून धरले जाणार आहे. (शहर प्रतिनिधी)