शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

फुलचूर-नवेगावात गॅस्ट्रोचे थैमान

By admin | Updated: September 24, 2015 02:15 IST

गोंदियालगतच्या फुलचूर गावासह नवेगांवबांध येथे दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोने थैमान घातले आहे.

१०० वर रुग्णांवर उपचार : फुलचूरमध्ये लावले विशेष शिबिरगोंदिया/नवेगावबांध : गोंदियालगतच्या फुलचूर गावासह नवेगांवबांध येथे दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोने थैमान घातले आहे. फुलचूर येथील १०० पेक्षा जास्त रुग्णांना गॅस्ट्रोची लागण झाली असून नवेगावबांध येथील १२ रुग्णांना ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.गोंदिया शहरालगत फुलचूर येथील वॉर्ड क्रमांक ३ मध्ये काही लोकांना मंगळवारी उलटी आणि हागवणीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे गौरव देवेंद्र शहारे (१३), मोहन दौलत नागपुरे (६०), संगीता अमरकंठ नागपुरे (३२), बळीराम नागपुरे (३०), प्रमिला डोंगरे (३४) तथा आणखी एका रुग्णालाय केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. वास्तविक फुलचूरच्या वॉर्ड नं. ३ मध्ये गॅस्ट्रोची लागण झाल्यानंतर खमारी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने एक शिबिर लावण्यात आले. या शिबिरात १०४ रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. प्राप्त माहितीनुसार, २५ ते ३० वर्षे जुन्या पाईपलाईनमुळे नळाची पाईपलाईन लिकेज झाली. हे पाणी एका खड्ड्यात जमा झाले. त्यातील दूषित पाणी पाईपलाईनच्या माध्यमातून नागरिकांच्या घरात पोहोचले. खमारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.नितीन कातोरे यांनी दूषित पाणी पिल्यामुळे गॅस्ट्रोची लागण झाल्याचे सांगितले. नवेगावबांध येथे पिण्याच्या पाण्याचा दुषीत पुरवठा झाल्यामुळे गावामध्ये गॅस्ट्रोची लागण झाली. आतापर्यंत ग्रामीण रुग्णालयात १२ रुग्णांची नोंद करण्यात आली. पावसाळ्याच्या कालावधीत पिण्याच्या पाण्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. आरोग्य सेविका परिसरातील पाण्याचे नमुने घेऊन तपासणीला पाठवितात. त्यानंतर ग्रामपंचायतच्या नोंदवहीत सूचना करतात. नवेगावबांध येथील आरोग्य सेविकेने दि. १९ सप्टेंबर २०१५ रोजी गावात दूषित पाणी पुरवठा होत असल्याने पाण्याची टाकी स्वच्छ ठेवून ब्लिचिंग पावडरचा वापर करावा अशी नोंदवहीत सूचना दिली. परंतु ग्रामपंचायत प्रशासनाने या सूचनेची कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे २२ सप्टेंबरपासून ग्रॅस्ट्रोचे रुग्ण दिसू लागले. नवेगावबांध येथे दुषित पाणी पुरवठा होत असल्याचे वृत्त मागील महिन्यात लोकमतने प्रकाशित केले होते. त्यावेळी ग्राम विकास अधिकारी टी.एम. समरित यांना पाण्याची नियमित तपासणी केली जाते असे सांगितले होते. मग आता गॅस्ट्रोची लागण कशी झाली असे प्रश्न निर्माण झाले आहे. रुग्णांची संख्या अजुन वाढण्याची शक्यता आहे. आतातरी ग्रामपंचायतने पाणी शुद्धीकरणावर भर द्यावा व हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी/वार्ताहर)