शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

गॅस सिलिंडर स्फोटाने घर जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 00:22 IST

येथील स्टेशन रोडवरील गजानन महाराज मंदिराजवळ बांगड्याचे व्यवसाजिक आसीफ शेख व भाऊ कलाम शेख यांचे घर आहे. त्यांच्या घरातील गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट झाल्याने सपूर्ण घर जळून खाक झाले.

ठळक मुद्देजीवित हानी टळली : शेख कुटुंबीयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : येथील स्टेशन रोडवरील गजानन महाराज मंदिराजवळ बांगड्याचे व्यवसाजिक आसीफ शेख व भाऊ कलाम शेख यांचे घर आहे. त्यांच्या घरातील गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट झाल्याने सपूर्ण घर जळून खाक झाले. ही घटना शनिवारी (दि.२९) सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली.गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे आगीने काही क्षणातच उग्र रुप धारणे केले.शहरातील नागरिकांनी याची माहिती गोंदिया व तिरोडा येथील अग्निशमन दलाला दिली. तसेच अदानी विद्युत प्रकल्पाच्या अग्निशमन वाहनाची सुध्दा मदत घेण्यात आली. तब्बल एक ते दीड तासाच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. मात्र या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाल्याने शेख कुटुंबीयांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवीत हाणी झाली नाही. आगीमुळे असीम शेख यांचा हात जळाला. आगीमुळे मात्र दोन्ही भावांचे संसार उघड्यावर आले आहे. दोन्ही कुटुंब फक्त अंगावरच्या कपड्यानिशी बाहेर पडल्याने बचावले. विशेष म्हणजे तिरोडा नगर परिषद अग्निशमन दलाची गाडी सुमारे दीड ते दोन तास उशिराने घटनास्थळी पोहोचली.अदानी प्रकल्पाच्या अग्निशमन वाहनाने ही आटोक्यात आणण्यात आली. तिरोडा न.प.अग्निशमन दलाच्या बेजवाबदार कारभाराबद्दल शहरवासीयांनी रोष व्यक्त केला. घटनेची माहिती मिळताच आ.विजय रहांगडाले, तहसीलदार संजय रामटेके, पोलीस निरीक्षक कैलास गवते, माजी आमदार दिलीप बन्सोड यांनी घटनास्थळी भेट दिली. आ.रहांगडाले यांनी शेख कुुटुंबीयांचे सात्वन करुन विमा कंपनीकडून व शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. दरम्यान गॅस एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी सुध्दा घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला.

टॅग्स :fireआगCylinderगॅस सिलेंडर