शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

गरिबाचा मुलगा ‘कलेक्टर’ बनू शकतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 21:04 IST

बच्चे मन के सच्चे होते है. कोशिश करने वालो की हार नही होती. विद्यार्थ्यांनी स्वप्ने मोठी बघावी. हिमालय चढण्याची जिद्द मनात धरायला हवी. आयएएस होण्यासाठी परीक्षा ही मराठीतून सुद्धा देता येते. एका गरिबाचा मुलगाही कलेक्टर बनू शकतो.

ठळक मुद्देनरेशचंद्र काठोळे : वडेगाव येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : बच्चे मन के सच्चे होते है. कोशिश करने वालो की हार नही होती. विद्यार्थ्यांनी स्वप्ने मोठी बघावी. हिमालय चढण्याची जिद्द मनात धरायला हवी. आयएएस होण्यासाठी परीक्षा ही मराठीतून सुद्धा देता येते. एका गरिबाचा मुलगाही कलेक्टर बनू शकतो. त्यासाठी सरावात सातत्य व मेहनत करण्याची जिद्द त्यात असावी. आपण गरीब आहोत, याचा आपणास अभिमान असला पाहिजे, असे मार्गदर्शन मिशन आयएएसचे संचालक डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी केले.वडेगाव येथील भिवरामजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी आयोजीत मार्गदर्शनपर कार्यक्रमात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी सरपंच तुमेश्वरी बघेले होत्या. प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून डॉ. नरेशचंद्र काठोळे, डॉ. पत्रे, प्राचार्य ए.डी. पटले, अध्यापक डी.आर. गिरीपुंजे, नागेश बळगे उपस्थित होते.डॉ. काठोळे पुढे म्हणाले, आतापासून कलेक्टर बनण्यासाठी नियोजन करुन अभ्यास करावा. दरमहा शंभर, वर्षभरात बाराशे प्रश्नांचे उत्तर पाठांतर केल्यास दहा वर्षांत एक लाख २० हजार प्रश्नांचे उत्तर पाठांतर होतील.दररोज वर्तमानपत्र वाचून त्यातील ए ते झेड पर्यंत प्रश्नांची वर्गवारी करुन अभ्यास करावा. मिशन आयएएस फिस फक्त एक रुपया ठेवण्यात आलेला आहे. अमरावती येथे दरवर्षी १० मे ते १६ मे दरम्यान शिबिराचे आयोजन केले आहे. त्यात तुम्ही सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.या वेळी सरपंच बघेले यांनी सांगितले, ‘आकाशी झेप घेरे पाखरा, तोडी सोन्याचा पिंजरा.’ शिक्षणासाठी घराचे बंधन तोडून बाहेर जा. उच्च शिक्षण घ्या व मोठे बणून दाखवा असे सांगत त्यांनी स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. प्राचार्य ए.डी. पटले यांनी स्पर्धा परीक्षेबाबत इंग्रजी विषयाचे महत्व सांगितले.कार्यक्रमाचे संचालन डी.एस. बोदेले यांनी केले. आभार जी.एन. बिसेन यांनी मानले. कार्यक्रमासाठी यु.एफ. टेंभरे, बी.यू. बिसेन, आर.बी. भांडारकर, विनोद धावडे, अरविंद टेंभेकर, संगीता वालदे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांनी सहकार्य केले.