शहरं
Join us  
Trending Stories
1
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
2
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
3
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
4
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
5
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती
6
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
7
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
8
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
9
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
10
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
11
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
12
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
13
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
14
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
15
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
16
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
17
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
18
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
19
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
20
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!

क्रेनच्या धडकेत माळी समाज अध्यक्षाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2022 05:00 IST

तेजराम भोलाजी किरणापुरे असे मृताचे नाव असून, त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे गावात वातावरण तापले होते व त्यांनी चक्काजाम आंदोलन केले. यात आमदार विनोद अग्रवाल यांच्या मध्यस्थीने मृताच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आल्यानंतर मध्यरात्री सुमारे ३.३० वाजता आंदोलन मागे घेण्यात आले. तेजराम किरणापुरे हे सायकलने मजुरीच्या कामावरून घरी परत जात असताना हायड्रा क्रेन क्रमांक एमएम३५- एआर ३१३३ च्या चालकाने त्यांना धडक दिली व त्यात किरणापुरे यांचा मृत्यू झाला.  

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :   गोंदिया-आमगाव मार्गावरील ग्राम खमारी येथील नैनादेवी राइसमिल जवळ क्रेनच्या धडकेत माळी समाज संघटनेच्या अध्यक्षांचा मृत्यू झाला. शुक्रवारी (दि.१८) सायंकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास  घडली. तेजराम भोलाजी किरणापुरे असे मृताचे नाव असून, त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे गावात वातावरण तापले होते व त्यांनी चक्काजाम आंदोलन केले. यात आमदार विनोद अग्रवाल यांच्या मध्यस्थीने मृताच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आल्यानंतर मध्यरात्री सुमारे ३.३० वाजता आंदोलन मागे घेण्यात आले. तेजराम किरणापुरे हे सायकलने मजुरीच्या कामावरून घरी परत जात असताना हायड्रा क्रेन क्रमांक एमएम३५- एआर ३१३३ च्या चालकाने त्यांना धडक दिली व त्यात किरणापुरे यांचा मृत्यू झाला.  या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला. मृताच्या कुटुंबीयांना मदत देण्याच्या मागणीला घेऊन खमारीवासीयांनी चक्काजाम आंदोलन केले. या घटनेची माहिती मिळताच आमदार यांनी घटनास्थळ गाठले व मृताच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी रात्री १२.३० वाजता चक्काजाम आंदोलन केले. जोपर्यंत क्रेनचा मालक येऊन कुटुंबीयांना आर्थिक मदत देत नही तोवर मृतदेह उचलला जाणार नाही या मागणीवर आमदार अग्रवाल व गावकरी अडून बसले होते. यावर क्रेनमालक घटनास्थळी आले व त्यांनी मृताच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून आमदारांनी रात्री ३.३० वाजतादरम्यान आंदोलन मागे घेतले. तसेच आमदार अग्रवाल यांनी स्वत: २५ हजार रुपयांची आर्थिक मदत मृताच्या कुटुंबीयांना दिली. प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात क्रेनचालकावर चुन्नीलाल राजाराम किरणापुरे (५३, रा.भरतनगर, खमारी) यांच्या तक्रारीवरून  भादंविच्या कलम २७९,३०४  (अ) भादवी सहकलम १८४ मोटार वाहन कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार गोस्वामी करीत आहेत.

 

टॅग्स :Chakka jamचक्काजाम