लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : कामठामार्गे गणेशनाला किकरीपार रस्त्यावर १० मार्चला रात्री १० वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्तींकडून चारचाकी वाहनावर दगडफेक करण्यात आली. यामुळे वाहनाचे नुकसान झाले तर दोन जण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.या घटनेत कट्टीपार कातुर्ली येथील वऱ्हाडी वाहनाचे काचे फुटले तर जि.प. सदस्य सुरेश हर्षे यांच्या वाहनाचे काच फुटले. कामठा येथील पुष्पा मेंढे यांच्या डोक्यावर दगड लागल्याने त्या जखमी झाल्या. दुग्ध व्यवसाय करणाऱ्या किकरीपार येथील दोघांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली. यामुळे वाहनांचे नुकसान झाल्याची माहिती सरपंच कविता मेंढे यांनी लोकमत प्रतिनिधीला दिली. दरम्यान वाहनावर दगडफेक करणारे नेमके कोण होते, त्यांचा दगड फेक करण्यामागील हेतू काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या प्रकारामुळे गावकरी व वाहन चालकांमध्ये दहशत आहे.रस्त्यावरील खड्ड्यांची अडचणया ठिकाणी रस्त्यावर मोठा खड्डा पडल्याने वाहन चालक वाहनांचा वेग कमी करतात. याच ठिकाणी अज्ञात इसमाकडून वाहनावर दगडफेक केली जात असल्याचे बोलल्या जाते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी रामलाल खोटेले,बाबूजी मेंढे, उपसरपंच डुडेश्वर भूते, रुपचंद खोटेले, कमल बारसे, मंगेश मेंढे, गुलाब पटले, सचिन हेमणे यांनी केले.
गणेश नाल्यावर वाहनांवर दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 21:52 IST
कामठामार्गे गणेशनाला किकरीपार रस्त्यावर १० मार्चला रात्री १० वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्तींकडून चारचाकी वाहनावर दगडफेक करण्यात आली. यामुळे वाहनाचे नुकसान झाले तर दोन जण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
गणेश नाल्यावर वाहनांवर दगडफेक
ठळक मुद्देवाहन चालकांमध्ये दहशत : कारवाई करण्याची मागणी