शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

तंत्रनिकेतनच्या पदविकाप्राप्त विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:27 IST

अर्जुनी मोरगाव (गोंदिया) : कोरोनाच्या संसर्गामुळे तंत्रनिकेतन शिक्षण बंद पडले. तंत्रनिकेतनच्या अंतिम वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षेत सरस गुण ...

अर्जुनी मोरगाव (गोंदिया) : कोरोनाच्या संसर्गामुळे तंत्रनिकेतन शिक्षण बंद पडले. तंत्रनिकेतनच्या अंतिम वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षेत सरस गुण देण्यात आले. त्यामुळे उन्हाळी २०२० पर्यंत उत्तीर्ण झालेल्या जुन्या विद्यार्थ्यांना त्या तुलनेत टक्केवारी कमी असल्याने हजारो जुने विद्यार्थी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशापासून वंचित झाले आहेत. प्रवेश न मिळाल्याने त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार आहे. शासनाने अशा विद्यार्थ्यांचा पुनर्विचार करण्याची मागणी केली जात आहे.

राज्यात मार्च २०२० मध्ये कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था बंद पडल्या. या विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षा घेण्यात आल्या. तंत्रनिकेतनच्या अंतिम वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षेत गुणांची सरबराई झाली. जवळपास प्रत्येक विद्यार्थी तंत्रनिकेतन पदविका अंतिम वर्षात उत्तीर्ण झाला. प्रत्येक विद्यार्थ्याला ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले. याचा जुन्या विद्यार्थ्यांवर थेट परिणाम झाला. हा एक प्रकारचा जुन्या विद्यार्थ्यांवर अन्यायच आहे. तंत्रनिकेतन पदविका घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षाला प्रवेश मिळतो. यासाठी मर्यादित जागा असतात. या जागांवर कोरोना काळात ऑनलाइन परीक्षेत गुणांची खैरात झाल्याने अंतिम वर्षाला राहून तंत्रनिकेतन पदविका घेणाऱ्या विद्यार्थ्यांची वर्णी लागली.प्रावीण्यप्राप्त व प्रथम श्रेणीत पदविका मिळविणारे जुने विद्यार्थी मात्र प्रवेशापासून वंचित राहिले. एरव्ही दरवर्षी अभियांत्रिकी प्रवेशाच्या अनेक जागा रिक्त असायच्या.कोरोनामुळे प्रभावित झालेल्या शैक्षणिक सत्रामुळे स्पर्धा वाढली व अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित झाले.आजघडीला पूर्व विदर्भातील अभियांत्रिकी महाविद्यालयात ( बीई )थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठी एकही जागा शिल्लक नाही.आता प्रवेश न मिळालेल्या अशा विद्यार्थ्यांनी वर्षभर काय करायचे असा मोठा प्रश्न पालकांसमोर पडला आहे.

......

दलालांचा सुळसुळाट

शहरी भागात अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या मोठी आहे.त्या तुलनेत तंत्रनिकेतन संस्था कमी आहेत.संस्थांची गुत्तेदारी कायम टिकवून ठेवण्यासाठी संस्थाचालकांनी ग्रामीण भागात दलाल नेमले आहेत.हे दलाल तंत्रनिकेतन उत्तीर्ण व अंतिम वर्षाला असलेल्या पालकांच्या घरी भेटी देऊन अभियांत्रिकी प्रवेश मिळवून देतो,त्याउपरही त्याला पैसे देऊ,अभियांत्रिकी अभ्यासक्रमादरम्यान त्याला कुठलाही खर्च करावा लागणार नाही अशी बतावणी करतात.पालकांना मोफत अभियांत्रिकी अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे प्रलोभन दाखवितात. या मोबदल्यात संस्थाचालक दलालांकडून विद्यार्थ्याचे मूळ प्रमाणपत्र मिळताच त्यांना प्रति विद्यार्थी १५ ते २० हजार रुपयांची बक्षिसी देतात.मात्र यावर्षी दलालांचा डाव फसला.

...........

रॅकेट सक्रिय

संस्थाचालकांनी दिलेली बक्षिसी यावर्षी पहिल्यांदाच दलालांनी त्यांना परत केली. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर संस्थाचालक डल्ला मारतात.यातून ते दरवर्षी लाखोंची माया मिळवितात.विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानंतर संस्थाचालकांकडून विद्यार्थ्यांचा पैशासाठी छळ होतो.अनेक विद्यार्थ्यांचे मूळ प्रमाणपत्र अडवून ठेवले जात असल्याचेही वृत्त आहे. नागपूर तसेच भंडारा जिल्ह्यातील साकोली,सेंदूरवाफा,तुमसर,तिरोडा, पवनी व ग्रामीण परिसरात अशा दलालांचे रॅकेटच असल्याचे समजते.