पांढरी : सडक-अर्जुनी तालुक्यातील गोंगले रेल्वे कार्यालयातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर महापुरूषांच्या फोटो (छायाचित्र) स्थानक व्यवस्थापकाने काढून घेतल्या. त्यामुळे बौद्ध बांधव व गावकऱ्यांमध्ये रोष व्याप्त झाला आहे.पांढरी येथील रहिवासी विजय मेश्राम यांनी गोंगले रेल्वे कार्यालयाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची फोटो दोन वर्षांपूर्वी भेट दिली होती. ती फोटो रेल्वे स्थानक व्यवस्थापक विद्याकुमार यादव यांनी काढून परत केली. तेव्हा पांढरी येथील बौद्ध संघटना रेल्वे स्टेशनवर जावून विरोध करू लागले. तेव्हा येथील स्थानक व्यवस्थापकाने नागपूर रेल्वेवरुन २३ फेब्रुवारी २०१५ रोजी आलेले डीआरएमचे नोटीस दाखविले. त्यामध्ये सर्व फोटो काढण्याचे नमूद असल्याचे बोलले जात आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांचे मन दुखावल्या गेले. गावकऱ्यांचा रोष वाढल्याचे पाहून स्थानक व्यवस्थापकांनी गावकऱ्यांना बोलावून सदर फोटो लावून घेतल्याची माहिती आहे. मात्र सदर प्रकरणाची योग्य चौकशी करण्याची मागणी विजय मेश्राम, जयेश उंदिरवाडे, सुरेश कोटांगले आदींनी केली आहे. (वार्ताहर)
महापुरूषांचे फोटो काढल्यावरून रोष
By admin | Updated: March 18, 2015 00:56 IST