शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

दिव्यांगांच्या कल्याणासाठी निधी कमी पडू देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 22:01 IST

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. विविध क्षेत्रात दिव्यांग बांधवांनी आपली गुणवत्ता दाखवून पुढे जाण्याचा प्रयत्न करावा. दिव्यांगांना कुठलाही निधी लागला तरी तो देण्यात येईल. दिव्यांगांच्या कल्याणासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. अशी ग्वाही पालकमंत्री डॉ.परिणम फुके यांनी येथे दिली.

ठळक मुद्देपरिणय फुके : दिव्यांग विद्यार्थ्यांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. विविध क्षेत्रात दिव्यांग बांधवांनी आपली गुणवत्ता दाखवून पुढे जाण्याचा प्रयत्न करावा. दिव्यांगांना कुठलाही निधी लागला तरी तो देण्यात येईल. दिव्यांगांच्या कल्याणासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. अशी ग्वाही पालकमंत्री डॉ.परिणम फुके यांनी येथे दिली.येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृहात आयोजित इयत्ता दहावी आणि बारावीमध्ये प्राविण्य प्राप्त जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांचा सत्कार रविवारी करण्यात आला. या वेळी ते बोलत होते.या वेळी प्रामुख्याने आ.विजय रहांगडाले, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, जि.प.उपाध्यक्ष अलताफ हमीद, समाज कल्याण समिती सभापती विश्वजीत डोंगरे, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती शैलजा सोनवाने, माजी जि.प.सदस्य राजेश चतुर, माजी न. प. सदस्य घनश्याम पानतावणे उपस्थित होते.फुके म्हणाले, दिव्यांग मुलांना शिक्षण व समाजाच्या मुख्य प्रवाहात जोडून त्यांनाही आत्मसन्मानाने जगता यावे व एक समाजाचा घटक म्हणून दिव्यांगांना योग्य स्थान मिळावे, यासाठी आपण प्रयत्नरत आहोत. दिव्यांगासाठी असलेल्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटीबध्द असल्याचे सांगितले. जि. प. समाज कल्याण विभागातंर्गत दिव्यांगांना तीनचाकी सायकली वाटप करण्यात येतात. हा एक स्तुत्य उपक्रम असून यामुळे दिव्यांगांच्या जीवनात नवचैतन्य निर्माण होणार आहे. एक दिव्यांग शासनाच्या योजनापासून वंचित राहणार यासाठी पूरेपूर प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी दहावी व बारावीतील दिव्यांग विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.ईशा बिसेन, प्राची बन्सोड, आरती मटले, विनोद बरडे, स्नेहा वाघमारे, अमीत बघेले, जुनेद तुरक, अक्षय भगत, रामेश्वर राऊत, रिना शहारे, पुनीत पटले, रोहन रंगारी, लक्ष्मी जुगनाहके,दर्शना थेर, प्रशांत उपराडे, निलेश्वर रकशे, निलम मेश्राम, आदित्य वलथरे, एस.जितेंद्र दोडानी यांचा समावेश आहे. एकूण २३१ विद्यार्थ्यांपैकी १७७ दिव्यांग विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.जि.प.समग्र शिक्षा जिल्हा समन्वयक कुलदिपीका बोरकर यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. प्रास्ताविक जिल्हा समन्वयक विजय ठोकणे यांनी मांडले. कार्यक्रमाचे संचालन दिलीप बघेले यांनी केले तर आभार शिक्षणाधिकारी आर.आर.हिवारे यांनी मानले.